• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Weather Update: पुण्यासह मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात पावसाचे ढग; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

Weather Update: पुण्यासह मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात पावसाचे ढग; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

Weather Update Today: राज्यात आणखी काही दिवस अवकाळी पावसाची (Non seasonal rain) स्थिती कायम राहाणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. आज पुण्यासह या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  पुणे, 10 मे: राज्यात आणखी काही दिवस अवकाळी पावसाची (Non seasonal rain) स्थिती कायम राहाणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दुपारपर्यंत कडक ऊन (Temperature) पडत आहे. तर दुपारनंतर राज्यात बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग (Cloudy weather) दाटत आहेत. तर रात्री उशिरा अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. तर पहाटे वातावरणात प्रचंड गारवाही निर्माण होतं आहे. परिणामी राज्यात सध्या उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा मुख्य तीन ऋतुंचा अनुभव मिळत आहे. आज दुपारी तीन वाजता हवामान खात्यानं घेतलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार, राज्यात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाचे ढग तयार झाले आहेत. पुढील दोन दिवस राज्यात हिच स्थिती असेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या तीन विभागात विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुढील 48 तासांत पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, जालना, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड या जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात विजांच्या गडगडासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उद्याही राज्यातील वातावरण काही अंशी अशाच प्रकारचं असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 48 तास या जिल्हांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट जारी केला आहे. हे ही वाचा-चहा प्यायल्याने होत नाही कोरोनाची लागण? वाचा काय आहे यामागचं सत्य गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे यावर्षीचा मान्सून बरसणार का ? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण या वर्षी जवळपास 98 टक्के पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या मान्सूनबाबत फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचं हवामान विभागातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: