मुंबई, 07 ऑक्टोंबर : राज्यात परतीचा पाऊस होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता पंरतु हा परतीचा पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावत शेतीचे मोठे नुकसान केले आहे. याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (दि. 07) मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या हलक्या सरी किंवा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. तर उद्या (दि. 08) ऑक्टोबर शनिवरी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
6/10, 11.55 pm, Latest satellite obs indicates the movement and intensification of clouds moving across the s peninsula, central India... pic.twitter.com/yBhfEppCHw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 6, 2022
तर पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईत किमान तापमान 27 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सियस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हे ही वाचा : सहकार मंत्र्यांकडून साखर कारखाने सुरू करण्याची घोषणा, ऊस आंदोलन पेटण्याची शक्यता
विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. आज (ता. 07 राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.
विजांसह पावसाचा इशारा कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही योजनेचा निधी; काय आहे कारण?
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत काही काळ पाऊस तळ ठोकण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात मुंबईत मुसळधार पाऊस पडणार नसून पावसाच्या हलक्या सरी बरसतील. हवामान विभागाच्या अधिकार्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 10 ऑक्टोबरनंतरच मान्सून निघून जाईल आणि पावसाळा थांबेल.