मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Weather Rain in Maharashtra : अबब! पाऊस अजून एवढे दिवस थांबणार, मुंबईकरांनो सावधान तुंबई होणार

Weather Rain in Maharashtra : अबब! पाऊस अजून एवढे दिवस थांबणार, मुंबईकरांनो सावधान तुंबई होणार

राज्यात मागच्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. झालेल्या पावसाने नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. (Weather Rain in Maharashtra)

राज्यात मागच्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. झालेल्या पावसाने नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. (Weather Rain in Maharashtra)

राज्यात मागच्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. झालेल्या पावसाने नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. (Weather Rain in Maharashtra)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 सप्टेंबर : राज्यात मागच्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. झालेल्या पावसाने नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. (Weather Rain in Maharashtra) मागच्या चार दिवसांपासू सुरू झालेला पाऊस आणखी चार दिवस सक्रीय राहणार असल्याचे हवामान विभागने सांगितले आहे. पुढचे चार पाऊस राज्यात थैमान घालण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या कोकण, घाट परिसरात मान्सून सक्रिय आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक घाट भागात पुढील काही तासांत अधूनमधून जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्याच्या काही भागांत मुसळधार सुरूच राहणार आहे. राज्याच्या काही भागांत 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर काही भागांत पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान, वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

हे ही वाचा : ठाण्यातील तलावपाली भागात मोठी वाहतूक कोंडी

कोल्हापूरला ‘यलो अलर्ट’ पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे (घाट-मुसळधार), कोल्हापूर (घाट-मुसळधार), सातारा (घाट-मुसळधार), औरंगाबादसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान मुंबईमध्ये होणाऱ्या पावसाने रस्त्यावर पाणी साचण्यसा सुरूवात होत आहे यामुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. तर लोकल सेवाही विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळी वारे व पाऊस यामुळे समुद्रदेखील खवळला असून सध्या पावसामुळे मच्छीमारी ठप्प झाली आहे. ताशी 45 ते 60 कि.मी. वेगाने जोराचे वारे वाहत आहेत. वातावरणातील बदलामुळे नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. स्थानिक नौकांबरोबरच मालवण, गुजरातमधील नौका देवगड बंदरात विसावल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर थरकाप उडवणारा अपघात, 9 वाहनं एकमेकांना धडकल्या

हवामान विभागाने 11 ते 15 सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. समुद्रात ताशी 45 ते 60 किमी. वेगाने वारे वाहणार असण्याची शक्यता वर्तविली. यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जावू नये, असा संदेश आल्याने समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.

यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच मालवण व गुजरातमधील नौकांचा समावेश आहे. पाऊस व वारा हे वातावरण आणखी दोन ते तीन दिवस असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यानंतर वारंवार होणार्‍या वातावरणातील बदलामुळे मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होत आहे. सध्या निर्माण झालेल्या वातावरणामुळे मच्छीमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.

First published:

Tags: Konkan, Mumbai rain, Weather, Weather forecast, Weather update