पुणे, 26 डिसेंबर: विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट (Non seasonal rainfall alert) निर्माण झालं आहे. येत्या दोन दिवसात 28 आणि 29 तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. आजपासून वायव्य भारतावर आणि 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 28-29 डिसेंबरला मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम आधीच वाया गेला असताना, रब्बी हंगामात अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वर्षाचा शेवट देखील वाईट होण्याची शक्यता आहे.
उद्या 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 25, 2021
राज्यात खाली दर्शविल्या प्रमाणे 28-29 डिसेंबरला
काही जिल्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.
-IMD
Pl see IMD Updates. pic.twitter.com/Y3M0zBMY4c
हवामाना खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून (26 डिसेंबर) वायव्य भारतात आणि 27 डिसेंबर पासून मध्य भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 28 आणि 29 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यलो अलर्ट विदर्भ आणि मराठवाड्यात 28 आणि 29 तारखेला पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा, अमरावती या जिल्हयांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय नाशिक, धुळे, बीड आणि नांदेड या चार जिल्ह्यांत मंगळवारी अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी कोसळणार आहेत. हेही वाचा- घनदाट काळोखात लोकवस्तीत शिरला बिबट्या; तिघांना केलं रक्तबंबाळ, धडकी भरवणारा VIDEO बुधवारी (29 डिसेंबर) देखील महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. बुधवारी हवामान खात्याने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकं वाहून जाण्याचा तसेच त्याच्यावर कीड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.