जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / IMD Weather Alert: 4 जिल्ह्यांसाठी पुढचे 3 तास धोक्याचे! वादळी पावसाबरोबर पडणार मोठ्या गारा

IMD Weather Alert: 4 जिल्ह्यांसाठी पुढचे 3 तास धोक्याचे! वादळी पावसाबरोबर पडणार मोठ्या गारा

IMD Weather Alert: 4 जिल्ह्यांसाठी पुढचे 3 तास धोक्याचे! वादळी पावसाबरोबर पडणार मोठ्या गारा

new cast warning Maharashtra weather: पुढच्या तीन तासांत तीन जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात जोरदार गारपीटही होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने (IMD ) दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 22 मार्च: अवकाळी पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना दोन दिवसात झोडपलं (Weather warning maharashtra) आहे. अजूनही हे थैमान थांबलेलं नाही. या लहरी हवेनं महाराष्ट्राच्या आणखी एका भागाला कवेत घेतलं आहे. सोमवारी मराठवाडा. विदर्भाचा काही भाग, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राबरोबर उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ हवा होती. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार (new cast warning maharashtra weather) पुढच्या तीन तासांत तीन जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात जोरदार गारपीटही होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने (IMD ) दिला आहे. IMD Mumbai ने दिलेल्या इशाऱ्यानुसार, नाशिक, धुळे, जळगाव आणि औरंगाद जिल्ह्यांत पुढचे 3 तास धोक्याचे असतील. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज इथे जमा झालेल्या उंचीवरच्या ढगांवरून देण्यात आला आहे. हवामान विभागाचे डॉ. के. एस होसाळीकर यांनी याबाबत Tweet करून माहिती दिली आहे.

    जाहिरात

    रात्री 10 वाजता हवामान विभागाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार अधिक उंचीवर दाट ढग जमा झाल्याने नाशिक, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी मोठ्या गारा (Hail strom) पडण्याचीही शक्यता आहे. ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहू शकतात. या वादळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वर्दळीच्या ठिकाणी कोसळला भलामोठा बॅनर विजांचा पाऊस सुरू झाल्यास शक्यतो गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, झाडाखाली किंवा मोडकळीला आलेल्या इमारती, भिंतीखाली उभे राहू नका, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसाने दोन दिवसात मराठवाड्यात अनेक ठिकाणी बळीराजाचं नुकसान केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हाताशी आलेलं पिक या अवकाळी पावसाने खराब केलं. अजूनही पुढचे काही दिवस या अवकाळी पावसाच्या ढगांचं महाराष्ट्रावर सावट असेल, असा अंदाज आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात