
राज्यभरात पावसाने धुमशान घातले असून कोकणात परिस्थितीत आणखी चिंताजनक होत चालली आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

24 आणि 25 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाण्यात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.




