जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लग्नाच्या वाढदिवसालाच अपघाताने मोडला सुखी संसाराचा डाव, पतीचा मृत्यू

लग्नाच्या वाढदिवसालाच अपघाताने मोडला सुखी संसाराचा डाव, पतीचा मृत्यू

लग्नाच्या वाढदिवसालाच अपघाताने मोडला सुखी संसाराचा डाव, पतीचा मृत्यू

सुखी संसाराला काही वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद तर त्याच दिवशी संध्याकाळी पतीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अमरावती, 8 जून : एकीकडे पती-पत्नीच्या सुखी संसाराला काही वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद तर त्याच दिवशी संध्याकाळी पतीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. तिवसा तालुक्यातील मोझरी गावात शनिवारी रात्री ही घटना घडली. सुभाष महल्ले वय 47 असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान सुभाष हे आपल्या दुचाकीने गुरुदेव नगर मधून पालखी पदयात्रा मार्गाने घरी परतत होते. मात्र वाटेतच आठवडी बाजार रोड परिसरातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यावेळी त्यांना प्रथम उपचारा साठी श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हेही वाचा - मंगळवेढ्यात विजेच्या धक्क्याने उद्योजक गोविंद घाडगे यांचा मृत्यू अपघातात डोक्याला गंभीर मार असल्याने त्यांना अमरावती येथील जिल्हा सामन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराअंती त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मागे बराच आप्त परिवार असून त्यांच्या जाण्याने महल्ले कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर त्यांच्या पत्नीला आपले पती आपल्याला सोडून गेल्याचा विश्वासच बसत नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घेण्याची गरज असल्याचं आवाहन करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात