मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! बसमध्ये चिमुकलीवर विनयभंग करून व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप STATUS वर केला अपलोड

धक्कादायक! बसमध्ये चिमुकलीवर विनयभंग करून व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप STATUS वर केला अपलोड

स्टेप 6 – या ठिकाणी खाली दिलेल्या नोटिफिकेशन टोनवर क्लिक करुन तुमच्या आवडीची रिंगटोन त्याठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर OK च्या बटणावर क्लिक करा. तुमची सेटिंग पूर्ण झाली. आता जेव्हाही त्या नंबरवरुन मेसेज येईल त्यावेळी तुम्हाला लगेच अलर्ट मिळेल.

स्टेप 6 – या ठिकाणी खाली दिलेल्या नोटिफिकेशन टोनवर क्लिक करुन तुमच्या आवडीची रिंगटोन त्याठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर OK च्या बटणावर क्लिक करा. तुमची सेटिंग पूर्ण झाली. आता जेव्हाही त्या नंबरवरुन मेसेज येईल त्यावेळी तुम्हाला लगेच अलर्ट मिळेल.

विनयभंग केल्यानंतर नराधमांनी तो व्हिडिओ स्वत:च्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सलाही ठेवला.

  • Published by:  Akshay Shitole
सचिन जिरे, औरंगाबाद, 18 जानेवारी : विशेष शाळेमध्ये शिकणाऱ्या 8 वर्षीय मतिमंद मुलीवर चालत्या बसमध्ये विनयभंग करण्यात आल्याची घटना औरंगाबामध्ये घडली आहे. विनयभंग केल्यानंतर नराधमांनी तो व्हिडिओ स्वत:च्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सलाही ठेवला. या गंभीर प्रकारामुळे औरंबादमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शाळेच्या बसमध्ये घरी सोडत असताना बस चालक आणि त्याच्या दोन मित्रांनी चिमुकलीचा विनयभंग केला. तसंच तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. एवढ्यावरच हे नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी या घटनेचे चित्रीकरण करून ते स्टेटसवर ठेवले. या स्टेट्समुळेच हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी बस चालकाला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. सातारा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विशेष मुलांच्या शाळेत शिकत असलेली एक 8 वर्षीय मतिमंद मुलगी शुक्रवारी संध्याकाळी शाळेच्या बस मधून घरी जात होती. तेव्हा बस चालकाने त्याच्या दोन मित्रांना बसमध्ये बसविले. त्यानंतर चालकाच्या बाजूला बसलेल्या लहान मुली सोबत या तिघांनी क्रूर पद्धतीने वागत तिचा विनयभंग केला. या तिघांमधील एकाने या सर्व घटनेचं मोबाईलमध्ये चित्रीकरण करून घेतलं. या वरच हे विकृत थांबले नाहीत तर तो विडिओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवला. अनैतिक संबंधातून झाली मुलगी, मातेनेच आवळला चिमुकलीचा गळा नराधमांनी शेअर केलेला हा व्हिडिओ एका नागरिकाने पहिला आणि याबाबत शाळा प्रशासनाला काळवलं. त्यानंतर शाळा प्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शाळेच्या मुख्यध्यापिकेच्या तक्रारीवरून याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले आहे. इतर दोघे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. 'वळदगाव,औरंगाबाद परिसरात स्वयंसिद्धा संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या गतीमंद मुलांच्या शाळेच्या स्कूलबसमध्ये घुसून काही टवाळखोरांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्याचा व्हिडीओही व्हायरल झालाय.अनिल देशमुखजी, हा घृणास्पद प्रकार करणाऱ्यांना तातडीने गजाआड करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत ही विनंती. अशा प्रवृत्तींना कठोर शासन होणे आवश्यक आहे,' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Aaurangabad, Aurangabad crime

पुढील बातम्या