Home /News /maharashtra /

Wardha : शाळेत राबविली जाणार लसीकरण मोहीम; 15 ते 17 वयोगटातील 63 हजार विद्यार्थांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट

Wardha : शाळेत राबविली जाणार लसीकरण मोहीम; 15 ते 17 वयोगटातील 63 हजार विद्यार्थांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट

title=

कोरोनापासून जनतेला वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य विभागाने शाळांपर्यंत पोहोचून लसीकरणाचा आग्रह धरण्याची तयारी केली असून, जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील केवळ 29.31 टक्के मुले आणि 15 ते 17 वयोगटातील 39.44 टक्के किशोरवयीन मुलांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत.

पुढे वाचा ...
    वर्धा, 1 जूलै: एकीकडे जिल्ह्यात कोरोनाच्या (Corona) चौथ्या लाटेची चाहूल दिसून येत आहे. तर दुसरीकडे लसीकरण मोहिमेला गती मिळत नसतानाही नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबत उदासीनता दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या ‘हर घर दस्तक’ (Har Ghar Dastak) मोहिमेलाही अल्प प्रतिसाद मिळत आहे. कोरोनापासून जनतेला वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य विभागाने शाळांपर्यंत पोहोचून लसीकरणाचा (corona vaccination)  आग्रह धरण्याची तयारी केली असून, जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील केवळ 29.31 टक्के मुले आणि 15 ते 17 वयोगटातील 39.44 टक्के किशोरवयीन मुलांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत.  15 ते 17 वयोगटातील 63 हजार 990 युवकांना कोरोनाची लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते पूर्ण करण्यावरही भर दिला जात असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी रामकृष्ण पाराळे यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने मोठा हाहाकार माजवला, रुग्णालयांमध्ये खाटांचा अभाव, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, अनेक नागरिकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, या साथीच्या आजारामुळे, जनजीवन विस्कळीत झाले. शेकडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यावेळी कोरोनाच्या लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता, मात्र, तिसर्‍या लाटेचा बराच काळ परिणाम होत नसल्याने, नागरिकही निर्भय झाले आहेत. सध्या लसीकरणाकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. वाचा- बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT जिल्ह्यात 10 लाख 70 हजार 352 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट लसीकरणासाठी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही इच्छुक दिसत नाही. जिल्ह्यातील 10 लाख 70 हजार 352 नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 10 लाख 20 हजार 896 जणांनी पहिली लस घेतली आहे, तर 7 लाख 88 हजार 585 जणांनी दुसरी लस घेतली आहे. आजही असंख्य नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. तर ज्यांना दोन्ही डोस घेतल्यानंतर नऊ महिने पूर्ण झाले आहेत त्यांना बूस्टर डोस दिला जात आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांची 12.93 इतकी टक्केवारी आहे.  लसीकरण केंद्रावर नागरिकांचा प्रतिसाद मिळेना केंद्रावर डोस घेण्यासाठी नागरिक उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य विभागाने हर घर दस्तक ही मोहीम सुरू केली, मात्र, यालाही नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर येत आहे, मोठ्या मुश्किलीने केवळ 1000 ते 1200 लोकांचेच एका दिवसात लसीकरण होत आहे. हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का? विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये लसीकरण शाळा, महाविद्यालये बंद असल्याने लहान मुले व किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला ब्रेक लागला होता, मात्र यावेळी शैक्षणिक टप्पा वेळेवर सुरू झाल्यामुळे शाळांमध्ये पोहोचून विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यातील 12 ते 14 वयोगटातील 41 हजार 362 बालकांना कॉर्बेव्हॅक्सची लस देण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 70.86 टक्के मुलांनी पहिली तर 29.31 टक्के मुलांनी दुसरी लस घेतली आहे. तर दुसरीकडे 15 ते 17 वयोगटातील 63 हजार 990 युवकांना कोरोनाची लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते पूर्ण करण्यावरही भर दिला जात असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी रामकृष्ण पाराळे यांनी दिली.
    First published:

    Tags: Corona vaccination, Wardha news

    पुढील बातम्या