मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Wardha : सेवाग्राममध्ये राहण्यासाठी गांधीजींनी घातली होती 'ही' अट

Wardha : सेवाग्राममध्ये राहण्यासाठी गांधीजींनी घातली होती 'ही' अट

X
महात्मा

महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना करून रचनात्मक कार्यासह स्वातंत्र्य चळवळीचे कार्य याच आश्रमातून सुरू केले.

महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना करून रचनात्मक कार्यासह स्वातंत्र्य चळवळीचे कार्य याच आश्रमातून सुरू केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India

वर्धा, 4 नोव्हेंबर : जगात महात्मा गांधीजी आपल्या विचार, कार्य आणि तत्त्वामुळे प्रसिद्ध आहेत. आश्रमीय आणि सामूहिक जीवन पद्धतीचा अंगीकार बापूंनी केला होता. सेवाग्राम आश्रमाची स्थापना करून रचनात्मक कार्यासह स्वातंत्र्य चळवळीचे कार्य याच आश्रमातून सुरू केले. तब्बल बारा वर्षे सेवाग्राम आश्रमात राहून देशासाठी कार्य केल्याने या आश्रमाचे महत्त्व जगात आहे. त्यांच्या कार्याने प्रेरणा घेण्यासाठी व नव्या पिढींना वास्तवातील गांधीजी कळावे यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक व अभ्यासक सेवाग्राम आश्रमात भेटी देतात. 

पर्यटक आश्रम परिसरातील वातावरण आणि शांतता यावर अधिक प्रभावित होतात. नव्या पिढीतील तरुण वर्गासाठी येथील स्मारके, कापूस ते कापड निर्मिती आणि आश्रमातील वातावरण अलौकिक अनुभूती देऊन जातात. गांधीजी 1932 साली वर्ध्यात आले. 1930 मध्ये गांधीजींनी 'नमक का कानून तोड दो' असा मंत्र देत मिठाचा सत्याग्रह पुकारला आणि दांडी यात्रेला आरंभ केला. 'स्वराज्य प्राप्त झाल्याशिवाय मी साबरमती आश्रमात परतणार नाही', अशी प्रतिज्ञाच त्यावेळी गांधीजींनी केली होती. मधली दोन-अडीच वर्षे प्रवासात आणि कैदेत निघून गेल्यावर जमनालाल बजाज यांच्या आग्रहाखातर 'निर्वासित' गांधीजी 1932 साली वर्ध्यात आले.

सेवाग्राम म्हणजेच सेवेचे गाव

खरा भारत गावागावात, खेड्यापाड्यात वसला आहे हे जाणून गांधीजींनी 'खेड्याकडे चला' अशी हाक दिली. वर्ध्यापासून पूर्वोत्तर भागात सात किलोमीटर अंतरावर असलेले 'शेगांव' गांधीजींनी आपल्या वास्तव्यासाठी निवडले. हे छोटेसे खेडे शेगाव कालांतराने 'सेवाग्राम' म्हणजेच सेवेचे गाव झाले.

आश्रमात राहण्यासाठी अट

गांधीजींचे सेवाग्रामातील पहिले निवासस्थान म्हणजे 'आदि-निवास'. आपल्या निवासस्थानाच्या निर्मितीवर पाचशे रुपयांपेक्षा जास्त खर्च करू नये आणि भोवतालच्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूच यासाठी वापराव्यात, अशी गांधीजींची अट होती. या अटीचीच पूर्तता करीत सहकाऱ्यांच्या श्रमातून आदिनिवास उभे राहिले. आदिनिवासमध्ये राहणाऱ्या सहकाऱ्यांची वाढती संख्या पाहून गांधीजींनी आपला मुक्काम मीराबेनने निर्माण केलेल्या कुटीत हलविला. त्याला लागूनच मीराबेनने दुसरी कुटी उभारली, तर गांधीजींनी त्यात आपले कार्यालय स्थापन केले.

Sangli : बेघरांसाठी मायेची 'सावली', शेकडो जणांना मिळाला आधार, पाहा Video

कुटीच्या भिंतींवर चित्राकृती

या दोन्ही वास्तू आज 'बापू कुटी' आणि 'बापू का दप्तर' म्हणून ओळखल्या जातात. गांधीजींच्या या कुटीची ठेवण आजही तशीच आहे. कालपरत्वे बापू कुटीच्या बाह्यरूपात थोडाफार बदल झाला असेल, मात्र मीराबेनने या कुटीच्या भिंतींवर लिंपलेल्या चित्राकृती म्हणजेच मोर, ताडाची झाडे, चरखा, ओम्, आदी आजही कायम आहेत.

Wardha : कचरा कुजेपर्यंत सफाईच होत नाही!, शहरात पसरलं घाणीचं साम्राज्य, Video

बैठकीकरिता आसन पद्धती

गांधीजींचे इथे वास्तव्य असताना अनेक राष्ट्रीय नेते, समाज सुधारक, देशीविदेशी अनुयायी आणि चाहते त्यांच्या भेटीला येत असत. या कुटीत गांधीजींनी बैठकीकरिता आसन पद्धती स्वीकारली होती. चर्चा, पत्रव्यवहार आणि दैनंदिन लेखन या साऱ्या क्रिया-प्रक्रिया या कुटीतूनच चालत असत. उन्हाळ्यातील कडक उष्मा आणि उष्ण हवेचा माराही गांधीजींच्या कार्यात अडथळा आणण्यास असमर्थ होता.

लोकनेत्याची संपन्न अभिरुची

गांधीजी जागा बदलण्यास तयार नसल्याने झाडांच्या पानोळ्यांपासून बनविलेला पडदा कुटीच्या दारावर लावून ती थंड करण्याचा प्रयत्न केला जाई. जगाच्या पाठीवरील सर्वात मोठे आंदोलन चालविणाऱ्या लोकनेत्याची संपन्न अभिरुची आणि जीवनातील साधेपणा याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे 'बापू कुटी' होय.

First published:

Tags: Local18, Mahatma gandhi, Wardha news