मुंबई, 29 मार्च : राज्यात मागच्या काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण विस्कळीत झाले होते. दरम्यान सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने तापमान सरासरी 36 अंशांपर्यंत पोहोचले आहे. तापमान वाढल्याने अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील जास्त उष्णता असणाऱ्या भुसावळ जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
या धोक्यापासून बचावासाठी भुसावळ जिल्ह्यातील सर्व 152 शासकीय व खासगी (प्राथमिक व माध्यमिक) शाळांची वेळ 1 एप्रिलपासून सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत केली आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काल (दि.28) सोमवारी आदेश काढले आहेत.
आंब्यावरील रोगाची वेळीच घ्या काळजी! 'या' पद्धतीनं करा तातडीनं उपाय, Video
गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमान वाढल्याने त्याचा परिणाम दैनंदिन जिवनावर होत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा उष्माघात प्रवण असल्याने व ही बाब आपत्ती या सदरात येत असल्याने उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
शाळांच्या वेळेतही बदल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील सर्व शासकीय त्याबाबत व खासगी (प्राथमिक व माध्यमिक) शाळांच्या वेळेत 1 एप्रिलपासून सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असा बदल करण्यात आला आहे.
राज्यातील वर्धा येथे उच्चांकी वर्धा 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती व यवतमाळ येथे कमाल तापमान 38 अंशांच्या पुढे होते. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 32 ते 37 अंशांच्या दरम्यान होते. तर, किमान तापमानातही चढ-उतार होत असून, बहुतांश ठिकाणी पारा 12 अंशांच्या पुढे कायम आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान 10.5 अंश सेल्सिअस तापमानाचा नोंद झाली.
बाबो! 4,33,333 रुपये किंमत; 4 लाखांच्या या फणसात आहे तरी काय पाहा PHOTO
छत्तीसगडपासून, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक ते दक्षिण तमीळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. ओडिशापासून झारखंडपर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्या (ता. 29) पासून विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heat, Local18, Weather Forecast, Weather Update, Weather Warnings