उन्हाळा किंवा एप्रिल-मे महिना म्हटला की आंबे, काजू यांच्यासह फणसही आलाच. अशाच एका फणस सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
फार फार तर फणसाची किंमत किती असेल काही शेकडो रुपये. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल हा एक फणस लाखो रुपयांचा आहे. या एका फणसाची किंमत 4,33,333 रुपये इतकी आहे.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बतवाल तालुक्यातील मूलरपटनामध्ये हा फणस खरेदी करण्यासाठी इथले स्थानिक नेते अझिझ आणि लतिफ यांच्यात या फणसासाठी चढाओढ लागली.
अखेर लतिफ यांनी लिलावाच्या बोलीत बाजी मारली. त्यांनी तब्बल 4,33,333 रुपयांची बोली लावली. या लिलावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.