जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रात बोगस बियाणे विक्री प्रकरणी धक्कादायक खुलासा, गुजरात कनेक्शन आलं समोर

महाराष्ट्रात बोगस बियाणे विक्री प्रकरणी धक्कादायक खुलासा, गुजरात कनेक्शन आलं समोर

वर्ध्यात बोगस बियाणे प्रकरणी मोठा खुलासा

वर्ध्यात बोगस बियाणे प्रकरणी मोठा खुलासा

वर्ध्यात बोगस बियाणे प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली असून तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील 14 नामांकित कापूस बियाणांच्या कंपनीची बनावट पाकिटे त्याने तयार केली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नरेंद्र मते, वर्धा, 16 जून : वर्ध्यात बोगस बियाणे प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली असून तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. बोगस बियाणे प्रकरणाचे कनेक्शन गुजरातपर्यंत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू जयस्वाल हा गेल्या तीन वर्षांपासून बोगस बियाण्याचा व्यवसाय करत होता. सुरुवातीला त्याने मध्य प्रदेशातून बियाणे आणले, त्यानंतर गुजरातमधून बियाण्यांची खरेदी करत होता. याशिवाय बियाण्यांच्या बॅग्ससाठी तो गुजरातमधून रिकामे प्लास्टिक पाकिट खरेदी करत असल्याचंही पोलिस तपासात उघड झालं आहे. बोगस बियाणे प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी राजू जयस्वालच्या घरी छापा टाकला. यात पोलिसांना 28 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. सेलू तालुक्यातल्या रेहकी इथल्या घरातून ही रक्कम पोलिसांनी जप्त केली. राजू जयस्वालला बोगस बियाणे विक्रीतून ही रक्कम मिळाल्याची माहिती समोर आलीय. महागाईच्या झळा आणखी तीव्र, भाजीला ‘सोन्याचा भाव’ पोलिसांनी बोगस कपाशी बियाणे प्रकरणी कारखान्यावर छापा टाकल्यानंतर तब्बल 1 लाख 18 हजार हून जास्त वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने प्रिंट केलेली रिकामी पाकिटे आढळून आली. राजू जयस्वालने 2020 मध्ये सेलू तालुक्यातील रेहकी इथं व्यवसाय सुरू केला. त्यानतंर 2021 मध्ये तो गुजरातमधून कच्चा माल आणत होता. यासाठी वर्ध्यातील गजू ठाकरे याच्या माध्यमातून त्याची लिंक जुळली होती. अहमदाबादच्या ईडरमधून तो बियाणे आणत होता. गेल्या महिन्यात राजू जयस्वालने म्हसाळा परिसरात व्यवसाय सुरू केला होता. महाराष्ट्रात परवानगी असलेल्या बियाणांच्या नावाने तो छापिल पाकिटे तयार करायचा. त्यासाठी महाराष्ट्रातील 14 नामांकित कापूस बियाणांच्या कंपनीची बनावट पाकिटे त्याने तयार केली होती. गुजरातमधून रिकामी पाकिटे आणून ती म्हसाळा इथं कारखान्यातच प्रिंट केली जात होती. त्याच्या कारखान्यातून जप्त करण्यात आलेल्या रिकाम्या पाकिटांची किंमत जवळपास 12 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली असून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकऱणाचा तपास पोलीस करत असून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: farmer
  • First Published :
जाहिरात
जाहिरात