पेट्रोल पंपावरील कर्मचारी कुणाल पिल्ले याने सांगितले की, सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक रिक्षाचालक रांग मोडून सीएनजी भरण्यासाठी पुढे आला. जेव्हा या रिक्षा चालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने वाद घालम्यास सुरुवात केली. यानंतर रिक्षा चालक तेथून निघून गेला आणि थोड्यावेळात पुन्हा आपल्या पत्नीसोबत पंपावर आला. संतापजनक! 2 वर्षांचा मुलगा हनुमानाच्या मंदिरात गेला, म्हणून दलित कुटुंबाला 25 हजाराचा दंड यावेळी रिक्षाचालकाची पत्नी आणि पेट्रोल पंप कर्मचारी कुणाल पिल्ले यांचा पुन्हा वाद झाला. त्यानंतर या महिलेने आपल्याला प्रथम शिवीगाळ केली आणि त्यानंतर मारहाण केली असंही पेट्रोप पंप कर्मचारी कुणाल याने सांगितले आहे. या घटनेप्रकरणी संबंधित महिलेच्या विरोधात आणि तिच्या पती विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. सीएनजी पंपावर वाहनांच्या रांगा या त्या प्रमाणात खूपच जास्त असतात याचं कारण म्हणजे सीएनजी पंपांची संख्या पेट्रोल पंपापेक्षा कमी आहे आणि सीएनजी भरण्यासाठी लागणारा वेळ आहे. Mumbai विमानतळावर आई आणि मुलीकडून 25 कोटींचे अमली पदार्थ जप्त मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. विमानतळावर तब्बल 4.95 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. जोहान्सबर्ग येथून आलेल्या दोन महिलांकडून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या या दोन महिला आई-मुलगी आहेत. रिपोर्ट्सनुसार, आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. काही दिवसांपूर्वी डीआरआयने गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास 3 हजार किलो हेरॉईन जप्त केले होते.CNG भरण्याच्या रांगेवरून वाद, महिलेची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण pic.twitter.com/BLtxwHCkxv
— News18Lokmat (@News18lokmat) September 22, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Virar, Virar crime