Home /News /maharashtra /

प्रेम विवाहाच्या 8 वर्षानंतर पत्नीने धक्कादायक कारणातून केला पतीचा खून, 7 वर्षांचा चिमुकला झाला पोरका

प्रेम विवाहाच्या 8 वर्षानंतर पत्नीने धक्कादायक कारणातून केला पतीचा खून, 7 वर्षांचा चिमुकला झाला पोरका

आरोपी महिलेला विरार पोलिसांनी (Virar Police) गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

नालासोपारा, 9 मार्च : एका महिलेने धारधार शस्त्राने पतीची हत्या (Husband murdered by wife) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदर महिलेला विरार पोलिसांनी (Virar Police) गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास विरार पोलीस करीत आहेत. मात्र या सगळ्या घटनेत 7 वर्षाचा मुलगा मात्र पोरका झाला आहे. सोमवारी सर्वत्र महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत होता. मात्र याच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विरारमध्ये पत्नी (नेहा) ने पती लोकेश याच्या पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे , सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे,विवेक सोनावणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. हेही वाचा- चोरी केल्याच्या संशयावरून अकोला शहरात मध्यरात्री दगडाने ठेचून एकाची हत्या विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश जगदीश पवार आणि त्याच्या पत्नीचा 8 वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. त्यांना 7वर्षांचा एक मुलगा देखील आहे. मात्र लोकेश हा दारू पिऊन मारहाण करत असल्याने पत्नी विभक्त झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी पुन्हा एकत्र आले होते. रविवारी रात्री एकच्या सुमारास लोकेश दारू पिऊन घरी आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि रागाच्या भरात पत्नीने लोकेशच्या पोटात चाकू खुपसून निर्घृणपणे हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. लोकेश जगदीश पवार असं हत्या झालेल्या पतीचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. मात्र दोघांच्या भांडणात 7 वर्षाचा मुलगा आता पोरका झाला आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून, आरोपी पत्नीला अटक केली आहे. आता या हत्येचे कारण कौटुंबिक कलह हेच आहे की अन्य काही, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पुढील तपास विरारच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Virar, Virar crime

पुढील बातम्या