जमुई, 26 मे : तसं पाहता आपण 21 व्या शतकात राहतो. मात्र आजही देशातील अनेक भागात चेटकीण, काळी जादूच्या नावाखाली महिलांवर अत्याचार होत आहेत. बिहारमध्ये विकासाबद्दल अनेक दावे केले जातात आणि वारंवार धक्कादायक वृत्त समोर येत आहेत. येथील जमुई जिल्ह्यातील सिमुलतला पोलीस ठाणे हद्दीत चेटकीणीच्या नावाखाली अंधश्रद्धेत अडकून गावकऱ्यांनी मॅट्रिक-इंटरपर्यंत शिकत असणाऱ्या दोन विद्यार्थिनींसोबत अत्यंत धक्कादायक कृत्य केलं आहे. सिमुलतला पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गादी टेलवा गावात राकेश साह यांच्या पाच महिन्याच्या मुलाचं काही कारणात्सव मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर घाबरलेले कुटुंबीय तांत्रिकाकडे गेले. येथे तांत्रिकने त्यांना सांगितलं की, या मुलाच्या हत्येमागे गावातील कोणा चेटकीणीचा हात आहे. बाळाचा मृतदेह गावाच्या बाहेर नदीच्या किनाऱ्यात रेतीखाली दफन करण्यास सांगितलं. ज्या चेटकीणीने त्याची हत्या केली आहे, ती त्याला खाऊ घालण्यासाठी रात्री नक्की तेथे येईल. बाळाचा मृतदेह दफन केल्यानंतर तात्रिकच्या सल्ल्यानुसार गावातील काही लोक त्या जागेवर लक्ष ठेवत होते. हे ही वाचा- आईला का मारलं, मुलाने बापावर कोयत्याने केले सपासप वार, बीड हादरलं! तेव्हात साधारण रात्री 12 वाजता नदीच्या किनाऱ्यावर दोन मुली जाताना दिसल्या. मुलींना पाहताना गावकऱ्यांनी त्यांना पकडलं आणि बांधून ठेवलं. त्यानंतर दफन केलेल्या बाळाला काढण्यात आलं आणि गावी नेलं. या दोन्ही मुलींवर बाळाला जिवंत करण्यासाठी दबाव आणला जात होता. मुलींनी गावकऱ्यांना सांगितलं की, त्या शेजारील गाव घांसीतरी येथील आहेत आणि शौचालयासाठी नदीच्या किनाऱ्यावर आल्या होत्या. मात्र बाळाचा मृत्यू आणि तांत्रिकाने पसरवलेल्या अफवेमुळे गावकऱ्यांनी मुलीचं ऐकलं नाही. गावकऱ्यांनी मुलींचे कपडे फाडले आणि केस कापले. याशिवाय गावकऱ्यांनी दोघींना बेदम मारलं. मुली या प्रकरणाबाबत काहीच माहीत नसल्याचं सांगत होत्या मात्र कोणीच त्यांचा एकही शब्द ऐकला नाही. याबद्दल सूचना मिळताच जवळील पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर सुशील कुमार सिंह घटनास्थळी पोहोचले. यानंतर एसएसबीच्या जवानांना बोलावून दोन्ही मुलींना गावकऱ्यांकडून सोडविण्यात आलं. सुशील कुमार सिंह पुढे म्हणाले की, मुलींचा जबाब नोंदविण्यात आला असून गावातील 11 जणांविरोधात प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.