मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : विनायक मेटे यांचं अपघाती निधन

BREAKING : विनायक मेटे यांचं अपघाती निधन

आज पहाटे  मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता.

आज पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता.

आज पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता.

    गणेश दुडम, प्रतिनिधी पनवेल, 14 ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. आज पहाटे  मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. उपचारदरम्यान  विनायक मेटे (vinayak mete) यांनी अखेरचा श्वास घेतला. (Vinayak Mete passed away) विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. या अपघातात मेटे हे जखमी झाले होते. हा अपघात इतका भीषण होता की, फॉच्युनर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. नेमका हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. या अपघातात मेटे जखमी झाले. त्यांना तातडीने पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातील त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात होते. पण उपचारदरम्यान सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अधिक माहितीनुसार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले होते. आज बीडमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व कार्यक्रम रद्द करून विनायक मेटे हे मुंबईला रवाना झाले होते. विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. आज पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,विनायक मेटे हे फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 या कारने प्रवास करत होते. चालक एकनाथ कदम हे विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांना घेऊन मुंबई बाजूकडे दुसऱ्या लेनने जात होते. पण कार चालकाचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे. चालकाला झोपेची डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी रुग्णवाहिकेनं एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी तपासून मयत घोषित केले. त्यांचा सुरक्षारक्षक पोलीस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आयआरबी रुग्णवाहिकेने तात्काळ MGM हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या