कोल्हापूर, 16 मार्च : कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा रोडवरील वडणगे परिसरात चक्रीवादळ सदृश्य स्थिती अनुभवायला मिळाली. या वादळात एका पेट्रोल पंपाच मोठं नुकसान झालंय.
या वादळाचा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. अचानकपणे या भागात असं चक्रीवादळ निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होतं. काही वेळानंतर हे चक्रीवादळ पन्हाळगडच्या दिशेने गेलं आणि मग नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण अचानक आलेल्या या चक्रीवादळामुळे नागरिक आणि वाहनधारकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोयता गँगने मुलाला बेदम मारहाण करून तोंडावर केलं मूत्रविसर्जन दरम्यान, मुळशी पॅटर्न सिनेमालाही लाजवेल असा प्रसंग पुण्यात घडला आहे. कोयता गँगने एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केलं आणि नग्न करून कोयत्यासह बेल्टने अमानुष मारहाण केली. या गँगमधील तरुण एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पीडित मुलाच्या तोंडावर मूत्रविसर्जन करून माणुसकीला काळीमा फासली.
हडपसर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. मन हेलावून टाकणारी घटना 12 मार्च रोजी मांजरी परिसरात घडली आहे. 16 वर्षीय मुलाला पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केली. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. एकमेकांकडे पाहण्याच्या क्षुल्लक कारणातून पीडित मुलाचा या गँगमधील तरुणांसोबत वाद झाला. त्यानंतर या गँगने कोयत्याचा धाक दाखवून रेल्वे स्टेशनच्या परिसरात नेलं. तिथे नेल्यावर या पाचही जणांनी या मुलाला बेल्टने मारहाण सुरू केली. या टोळक्याने या मुलाला अर्धनग्न केलं आणि लाथाबुक्याने आणि बेल्टने अमानुष मारहाण केली. बेदम झालेल्या या मारहाणीत हा मुलगा अखेर बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतरही ही टोळकी इथं थांबली नाही. त्यांनी त्याच्या तोंडावर मूत्रविसर्जन केलं आणि पसार झाले. हा मुलगा दोन दिवसांपासून बेशुद्ध असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी या आरोपी तरुणांची ओळख पटवली आहे. हे सर्व जण कुख्यात गुन्हेगार असून कोयत्या गँगचे सदस्य आहे. या व्हिडिओच्या आधारे पाचही तरुणांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.