बाळासाहेब काळे, पुरंदर
पुरंदर, 09 जून : चक्रीवादळं येणं भारतात नवं नाही.. पण एका वादळानं पुरंदर तालुक्यातील तलावाचं पाणी जेव्हा वर आकाशात ओढलं गेलं तेव्हा ग्रामस्थांचे मात्र भितीनं गाळण उडाली...
पुरंदर तालुक्यातील नाझरे तलावातील हे दृश्य...ज्यात तलावाचं पाणी आकाशात जाताना पाहुन हे नमकं काय होतंय असा प्रश्न पुरंदर वासियांना पडला आणि अनेकांनी मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. भारतात असं कदाचित घडलंही असेल. पण पहिल्यांदाच याची दृश्य पाहायला मिळतायत...
अनेक देशात चक्रीवातादरम्यानं पाणी आकाशात गेल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यात होणारं विध्वंसही दिसतो. पण पुरंदरमधील हे चक्रीवादळात तितकं मोठं आणि विध्वंसक ठरलं नसलं तरी निसर्गाचं हे रौद्र रुप कुणाच्या काळजात धडकी निर्माण करणारं होतं. पाण्यातलं हे वादळ मानवी वस्तीत धडकलं असतं तर ही कल्पानाच अंगावर काटा आणणारी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.