— Raj Thackeray (@RajThackeray) May 4, 2022या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे हे मशिदींवरील भोंग्यांबाबात ठाम भूमिका घेताना बघायला मिळत आहे. राज ठाकरेंना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मुंबईत पोलिसांनी (mumbai police) राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने राज ठाकरे यांना कलम 149 ची नोटीस बजावली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कसबे यांनी ही नोटीस बजावली आहे. आज संध्याकाळी शिवाजी पार्क पोलिसांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बंदोबस्त वाढवला होता. त्यानंतर राज ठाकरे पत्रक प्रसिद्ध करून माघार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. राज ठाकरेंचं आव्हान 'हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी "सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे' असं आव्हानच राज ठाकरेंनी दिलं आहे. मुंबईमध्ये 1144 मशिदींनी केले भोंग्यांसाठी पोलिसांकडे अर्ज मागील महिन्याभरात मुंबईत हजाराहून जास्त मशिदींनी (mumbai masjid ) भोग्यांसाठी परवानगी घेतली आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्या उपस्थितीत केल्यामुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय वातवरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोंगे वाजवावे जर अनधिकृत भोंगे असतील तर ते काढून टाकावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. उद्या 4 मे पर्यंत राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला आहे. पण मुंबईतील हजारो मशिदींनी रितसर परवानगी घेण्यासाठी पुढे आल्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरात मुंबईत 1144 मशिदींनी अर्ज केले आहे. या मशिदींनी भोंग्या संदर्भात परवानगीसाठी अर्ज केले आहे. यापैकी 803 मशिदींना परवानगी देण्यात आली आहे. सर्व मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या नियंमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bal Thackeray (Politician), MNS, Raj Thackeray (Politician), Shivsena