जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / स्तब्ध चेहरा...सुकलेले अश्रू...विनायक मेटेंच्या पत्नीवर मोठा आघात, Video आला समोर

स्तब्ध चेहरा...सुकलेले अश्रू...विनायक मेटेंच्या पत्नीवर मोठा आघात, Video आला समोर

स्तब्ध चेहरा...सुकलेले अश्रू...विनायक मेटेंच्या पत्नीवर मोठा आघात, Video आला समोर

पतीच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या पत्नीवर मोठा आघात झाला आहे. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 ऑगस्ट : शिवसंग्राम अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज अपघाती निधन झालं. मेटे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर त्यांच्या कारला अपघात झाला आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. महाराष्ट्राला हा मोठा धक्का आहे. त्यांच्या अशा निधनाने महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना याचा धक्का तर बसलाच आहे. मात्र सर्वात मोठा धक्का हा त्यांच्या कुटुंबीयांना आहे. घरचा मोठा आधार यामुळे हरपला आहे. विनायक मेटे यांना 2 मुलं असून त्यांच्या मुलाचं नाव आशुतोष विनायक मेटे (वय १८), तर मुलीचं नाव आकांक्षा विनायक मेटे (वय २१) आहे. विनायक मेटे यांना दोन भाऊ आहेत. रामहरी तुकाराम मेटे आणि त्र्यंबक तुकाराम मेटे अशी त्यांच्या भावांची नावं आहे. Vinayak Mete : हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त, एका क्षणात मुलांच्या खांद्यावरील मायेचा हात हरपला… पतीच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या पत्नीवर मोठा आघात झाला आहे. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मेटेंचं अचानक जाण्याने त्यांच्या पत्नींचीही तब्येत बिघडली आहे. त्यांना सलाइन लावण्यात आलं आहे. त्यांच्या हा व्हिडीओ पाहून कोणालाही वाईट वाटेल. मुलांच्या डोक्यावरील मायेचा हात हरपल्याने आईवर मोठा आघात झाला आहे.

१९८६ मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून विनायक मेटेंनी कामाला सुरुवात केली. १९८७ मध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख निवड करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात