Home /News /maharashtra /

विदर्भात अचानक कोरोनाचा का होतोय उद्रेक? समोर आलं मोठं वास्तव

विदर्भात अचानक कोरोनाचा का होतोय उद्रेक? समोर आलं मोठं वास्तव

मुंबई, पुण्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा अचानक विदर्भात उद्रेक कसा काय झाला?

    अमरावती, 15 फेब्रुवारी : देशात एकिकडे कोरोना रुग्णांची (coronavirus) संख्या कमी होते आहे. आठवडाभरात देशातील 188 जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, असा दिलासा केंद्र सरकारनं दिला आहे.  पण महाराष्ट्राची चिंता मात्र कायम आहे. सर्वात आधी मुंबई, पुण्यात थैमान घालणाऱ्या कोरोनानं आता विदर्भाकडे (vidarbha) कूच केली आहे. गेली वर्षभर मुंबई, पुण्याला विळखा घालणाऱ्या कोरोनानं या वर्षात विदर्भाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. या वर्षात कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणं विदर्भात आढळून येत आहेत. विदर्भात शनिवारी सलग चौथ्या दिवशी एक हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले. कोरोनाची प्रकरणं अचानक वाढल्यानं आता रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही घटलं आहे. रिकव्हरी रेट 95 टक्क्यांच्या खाली आला आहे. परिणामी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अमरावती 14 दिवसांत 3154 रुग्ण अमरावती जिल्ह्यात गेल्या चौदा दिवसात 3154 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसांची आकडेवारी पाहिली तर, 10 फेब्रुवारीला 315 , 11 फेब्रुवारीला 359, 12 फेब्रुवारीला 369 , 13 फेब्रुवारीला 376 आणि 14 फेब्रुवारीला 399 रुग्ण आढळले आहेत. झोपडपट्टीपेक्षा मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वस्तीतच जास्त आहे.  1 फेब्रुवारीला अमरावतीतील पॉझिटिव्ही रेट म्हणजे संक्रमित रुग्णांचं प्रमाण 22 टक्के होतं. जे  56 टक्क्यांवर गेलं आहे. नागपुरात गेले पाच दिवस 400 च्या वर नवे रुग्ण आज नागपुरात 498 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील पाच दिवसांत दररोद 400 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहे. नागपुरात कोरोनाचे 9 हॉटस्पॉट आहेत. जिथं कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. इतर जिल्ह्यांतूनही धोक्याची घंटा अमरावती, नागपूरशिवाय यवतमाळ, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्येही कोरोनाची प्रकरणं सातत्याने वाढतच आहे. तर शनिवारी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा इथं कोरोना प्रकरणं कमी झालेली असताना रविवारी मात्र या ठिकाणाहीदेखील लक्षणीय प्रमाणात नवे रुग्ण वाढले आहेत. केंद्रीय पथकानंही व्यक्त केली चिंता कोव्हिड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं की, दिल्लीच्या केंद्रीय पथकाबरोबर आमची बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी 10 ते 14 जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं नमूद केलं. ज्यात अमरावती, अकोला याबद्दल विशेष चिंता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी सरळ आकडेवारी पाहण्यापेक्षा दशलक्ष लोकसंख्येपैकी किती याचा विचार व्हायला हवा. या ठिकाणी टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि उपचारातील प्रोटोकॉलमध्येही सुधारणा करून त्याबाबत अधिक प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असं या पथकानं सांगितल्याचं डॉ. ओक म्हणाले. विदर्भात अचानक का वाढत आहेत कोरोना रुग्ण? नागरिकांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा भोवतो आहे.  प्रवासाला मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे लोक सगळीकडे बिनधास्त फिरत आहेत. पण त्याचवेळी कोरोनासंबंधी नियमांचं पालन करणं बंधनकारक असताना, ते मात्र कुणी पाळताना दिसत नाही. कोरोना रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक आहे. पण मास्क न घालताच लोक बिनधास्तपणे फिरत आहेत. बाजारात जातानाही मास्क लावला जात नाही. हे वाचा - मोदी सरकारला कोरोना लशीचा 'ताप'; दुसरा डोस सुरू करताच समोर आली धक्कादायक माहिती गेल्या वर्षी लोकांनी अगदी साधेपणानं आपली लग्न आटोपली. काही जणांनी ऑनलाईन पद्धतीनं लग्न केलं. यानंतर  लग्न समारंभात 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीला या नियमाची अंमलबजावणी झाली. पण आता हा नियम सर्रासपणे धाब्यावर बसवला जातो आहे. शेकडो, हजारो लोकांना लग्नाचं आमंत्रण दिलं जातं आहे आणि या लग्न समारंभातही लोकांच्या चेहऱ्यावर मास्क नसतो. त्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत आणि जानेवारीत ग्रामपंचायत निवडणुकाही झाल्या. या सर्व गोष्टी कोरोनाला हातपाय पसरण्याची मुभाच मिळाली. पुन्हा लॉकडाऊन लागणार? अनलॉकनंतर अमरावती जिल्ह्यातील नागरिक बिनधास्त झाले आहेत त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. यामुळे प्रशासनाला नाईलाजास्तव जिल्ह्यात संचार बंदी जाहीर करावी लागलेली आहे. हे वाचा - मोदी सरकारला कोरोना लशीचा 'ताप'; दुसरा डोस सुरू करताच समोर आली धक्कादायक माहिती दरम्यान ज्या भागात रुग्ण वाढत आहेत, त्या भागात टेस्टिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोनाबाबत नियम पाळले जात नाहीत हे दुर्दैवी आहे. (then lockdown will apply again Alert from Thackeray government) जर नियम पाळले जात नसतील तर पुन्हा लॉकडाऊनकडे जाण्याची शक्यता आहे, असा अलर्ट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या