नागपुरात घराची भिंत कोसळून दोन ठार तर महिला गंभीर जखमी

सावनेर मार्गावर बोरुजवाडा येथे एका घराची भिंत कोसळून 2 जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 05:48 PM IST

नागपुरात घराची भिंत कोसळून दोन ठार तर महिला गंभीर जखमी

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर,2 नोव्हेंबर: सावनेर मार्गावर बोरुजवाडा येथे एका घराची भिंत कोसळून 2 जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. एक जण 1 गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये एक तरुण आणि एका मुलाचा समावेश आहे. तर महिला जखमी आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बोरुजवाडा येथील या घरात हे लोका भाड्याने राहत होते. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान शनिवारी सकाळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. सकाळी साडेपाचच्या सुमारास घराची भिंत कोसळल्याचे दोघांचा मृत्यू झाला. भिंत कोसळल्यानंतर आसपासचे लोक मदतीसाठी धावून आले. या दुर्घटनेत अतुल उईके (वय 17), सुरेश करनरकर (वय 30) हे दोघे मृत्युमुखी पडले तर उर्मिला उईके (वय 50) ही महिला जखमी झाली आहे. सावनेर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मायलेकाचा नदीत बुडून मृत्यू, भाऊबिजेसाठी आली होती माहेरी

भाऊबीज सणासाठी माहेरी आलेल्या विवाहितेसह 3 वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना धोंदलगाव (ता. वैजापूर) येथे घडली. सोनाली ऊर्फ पूनम राजू आघाम (वय-22) आणि प्रथमेश राजू आघाम (वय-3, रा.गुरुधानोरा, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) असे मृत मायलेकाची नावे आहेत.

Loading...

सोनाली दिवाळी सणासाठी दोन दिवसांपूर्वी आपल्या दोन मुलांसह धोंदलगाव (माहेर) येथे भाऊ कृष्णा करवंदे यांच्याकडे आली होती. गुरुवारी (31 ऑक्टोबर) दुपारी सोनाली कपडे धुण्यासाठी गावाजवळच्या नदीवर गेली होती. तिच्यासोबत प्रथमेशही होता. नदीकाठावर खेळताना तो नदीत पडल्याचे लक्षात आल्यावर सोनाली यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने मायलेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांनी 30 ते 35 फूट खोलवर पाणीसाठ्यातून मायलेकांना बाहेर काढून वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वैजापूर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. दरम्यान, सोनालीचा 5 वर्षांचा मोठा मुलगा अन्वेश घरी थांबल्याने तो थोडक्यात बचावला.

समृद्धी महामार्गासाठी नदीचे खोदकाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी धोंदलगाव येथील नदीतून मोठया प्रमाणावर भराव काढण्यात आल्याने खोलीकरण झालेल्या नदीपात्रात परतीच्या पावसामुळे मुबलक पाणी साठा झाला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 कोंटींची तरतूद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...