बीड, 06 जून : बीडमध्ये शनिवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झोपलेल्या बाप-लेकाच्या अंगावर जेसीबी गेला. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा इथल्या शेतात पाईपलाईनचे काम चालू असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर डोळ्यांदेखल आपल्या वडिलांना गमावल्यामुळे मुलाला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडिला आणि मुलाग शेजारी-शेजारी शेतामध्ये झोपले होते. पण शेतात रात्रीच्या वेळा कामाला सुरुवात झाली आणि अंधार न दिसल्यामुळे बाप-लेकाच्या अंगावर जेसीबी गेला. यात जोरात चिरडलं गेल्यामुळे बापाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली.
मारफळा तांडा येथील अंकुश राठोड यांच्या शेतात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने पाईपलाईन खोदण्याचं काम सुरू होतं. साहेबराव रूपा राठोड व त्यांचा मुलगा मनोज राठोड हे बाजूला जाऊन झोपले होते. मात्र, काम चालू असताना चालकाच्या लक्षात न आल्यानं ते दोघेही जेसीबीच्या खाली आले. यात साहेबराव रूपा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा मनोज साहेबराव राठोड गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गर्भवती महिलेला 8 रुग्णालयांनी दिला नकार, 13 तासांनी रुग्णवाहिकेतच झाला मृत्यू
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांत या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आला आहे. तर मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साहेबराव राठोड यांच्या अशा जाण्यामुळे राठोड कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार नेमका कसा घडला याचा पोलीस तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत भारताने रेकॉर्ड मोडला, समोर आली सगळ्यात जास्त आकडेवारी
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed