नागपूर, 11 सप्टेंबर : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. आता ते मुंबई इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिवपदी काम पाहत आहेत तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन महापालिका आयुक्त आहेत. पण बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे हे आज ते मुंबईला जात असता त्यांच्या समर्थानात नागपूरकर रस्त्यावर उतरले आहेत. तर त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही सुरू आहे. खरंतर, आपल्या स्पष्ट आणि रोखठोक कामामुळे तुकाराम मुंढे हे नागरिकांच्या मनातले अधिकारी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंढे हे आज त्यांच्या कुटुंबासह मुंबईला निघाले होते. तेव्हा नागपूरकरांनी मोठा फुलांचा वर्षाव केला आणि त्यांच्या गाडीच्या पुढे येऊन गाडी अडवण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला. नागपूर्वासियांनी महापौर मुर्दाबाद आणि भाजपच्या नेत्यांच्या विरोधात मुर्दाबाद असे नारेसुद्धा लावले, यावेळी पोलिसांची मोठी तारांबळ उडाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कंगनाने शेअर केला बाळासाहेबांचा जुना VIDEO, पुन्हा एकदा शिवसेनेवर केली जहरी टीका
खरंतर, तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना ते सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन अशा वादात सापडले होते. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. यावरून तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली होती.
कंगनाच्या अडचणी वाढणार, ड्रग्जसंदर्भात मुंबई पोलिसांना कसून चौकशीचे आदेश
तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकरीवरुन काढून टाकलं होतं. पण तुकाराम मुंढे स्वत: स्मार्ट सिटीचे नियमानुसार सीईओ झाले नव्हते. मग त्यांनी सात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कसं काढलं? अशाप्रकारची याचिका सात कर्मचाऱ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याचबरोबर भाजपचे महापौर आणि नगरसेवकांनी तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tukaram munde