Home /News /maharashtra /

तुकाराम मुंढे इन अॅक्शन, कोरोनावर मात करण्यासाठी नागपूरकरांसाठी काढला नवा आदेश

तुकाराम मुंढे इन अॅक्शन, कोरोनावर मात करण्यासाठी नागपूरकरांसाठी काढला नवा आदेश

या आदेशामुळे नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

नागपूर, 22 मे : महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाऊन संबंधिचे नवीन आदेश आले असून नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे आदेश 22 मेपासून अंमलात येणार आहेत. या आदेशामुळे नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. नवीन आदेशानुसार खाजगी कार्यालयं पूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच मार्केट, मॉल्स, टॅक्सी सेवा बंद राहणार असून फक्त जीवनावश्यक संबंधित दुकानं वगळता जास्तीत जास्त पाच सुरू राहतील, असेही आदेशात नमूद केलं आहे. त्यामुळे विनाकारण नागपूरकरांनी बाहेर निघू नका अशा सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे वाढता संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार रात्री उशीरा निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूर शहर रेड झोनमध्ये कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणेकरांनो 7च्या आत घरात व्हा! पोलीस आयुक्तांनी दिले कारवाईचे नवे आदेश दरम्यान, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 30 हजारांवरच्या वर पोहोचला आहे. त्यामुळे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपला. त्यानंतर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला. या टप्प्यात राज्य सरकारने अधिक अटी शिथिल करण्याची तयारी केली. रेड झोन क्षेत्रांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जर शासकीय कार्यालय येत असतील तर ते बंद राहतील, अशा स्वरूपाचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी काढले. राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोविड-19 रुग्णसंख्या मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर या प्रमुख शहरात वाढताना दिसतच आहे. ही प्रमुख शहरं रेड झोन क्षेत्रात येत असून या शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अटी शिथिल न करण्याचा विचार राज्य सरकारने घेतला. अखेर पिंपरी चिंचवडकरांनी जिंकली लढाई, आजपासून असणार नवीन नियम संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या