जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अनैतिक संबंधातून रचला धक्कादायक हत्येचा कट, डोक्यात दगड घालून केलं खल्लास

अनैतिक संबंधातून रचला धक्कादायक हत्येचा कट, डोक्यात दगड घालून केलं खल्लास

अनैतिक संबंधातून रचला धक्कादायक हत्येचा कट, डोक्यात दगड घालून केलं खल्लास

प्रेमसंबंधातून एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 13 ऑगस्ट : राज्यात कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. हत्येचा असाच एक भयानक प्रकार वर्धामध्ये समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधातून एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शांतीनगर इथे रक्षाबंधनाकरता मित्राबरोबर आलेल्या मित्राचा महिलेच्या पतीने कैलास ढुमणे (28) रा. मोहा जिल्हा यवतमाळ याचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना काल बुधवार 12 रोजीच्या मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास शांतीनगर परिसरात घडली. या प्रकरणी रामनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला असुन विलास उर्फ बाल्या कासार (40) रा. कळंब जि. यवतमाळ याचा शोध घेतला जात आहे. लज्जास्पद! प्रियकरासोबत आईने लेकीला दाखवले PORN VIDEO, पुण्यातला भयंकर प्रकार पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास ढुमणे सोबत विलास कासारची पत्नी यवतमाळ इथून शांतीनगर इथे मानलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी 5-6 दिवसांपुर्वी आले होते. त्यानंतर विलास कासार इथे आला. काल बुधवार 12 रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान कैलास ढुमणे, विलास कासार त्याची पत्नी, छोटी मुलगी धोत्रा इथे बहिणीच्या घरी पायदळ जायला निघाले. पाऊस वाढल्याने ते शांतीनगर परिसरात असलेल्या डेहनकर यांच्या ढाब्याजवळ थांबले. पाऊस थांबत नसल्याने तेथेच हॉटेलमध्ये जेवण करुन जवळ असलेल्या शेखर मोटरच्या शेडमध्येच झोपले. रात्री 12.30 च्या दरम्यान विलास कासार याने झोपलेल्या कैलासला दगडाने ठेचून काढलं. घटनेची माहिती नरेंद्र डेहनकर यांनी रामनगर पोलिसांना दिली. 15 ऑगस्टवर आसमानी संकट, 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनाजी जळक, महेश इटकर, श्‍वान पथक घटनास्थळी दाखल झाले. कैलासला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळावरुन खून करण्यात आलेले दगडं जप्त करण्यात आला. या प्रकरणी विलास कासार याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रामनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात