जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मोठी बातमी! मुंबईत क्वारंटाईनचे नियम बदलले; पालिकेने परिपत्रक काढून दिली माहिती

मोठी बातमी! मुंबईत क्वारंटाईनचे नियम बदलले; पालिकेने परिपत्रक काढून दिली माहिती

मोठी बातमी! मुंबईत क्वारंटाईनचे नियम बदलले; पालिकेने परिपत्रक काढून दिली माहिती

गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणे पालिकेने शक्य झाले आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत बऱ्याच अंशी कोरोना बाधितांची संख्याही नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आलं आहे. त्यात पालिकेने कोरोना रुग्णांच्या क्वारंटाईन नियमावलीत मोठा बदल केला आहे. आता पालिकेने क्वारंटाईनचे नियम बदलले असून 50 वर्षे व त्या पुढील वयाच्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी विलगीकरणात राहता येणार नाही. या रुग्णांना कोणतीही लक्षणं नसली मात्र त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर त्यांना ccc2 म्हणजेच कोविड केअर सेंटर मध्ये रहावं लागणार आहे. तसेच अशा रुग्णांच्या घरी आणि इमारत किंवा चाळीच्या कॉमन जागांवर पालिकेकडून  sanitization करण्यात येणार आहे. 50 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींचा मृत्युदर अधिक असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. याआधी मात्र morbidity आणि सौम्य लक्षणे असलेल्या 60 वर्षे वयापर्यंतच्या व्यक्तींना घरी राहता येत होतं. पालिकेने नवं  परिपत्रक काढत होम islolationचे नियम बदलले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. अद्यापही राज्यात हॉटेल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. आजपासून आंतरजिल्हा एसटी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत परदेशातून एअर लाइन्सने मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना टेस्ट करण्यात येईल. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितल्यानुसार परदेशातून मुंबईत दाखल होणाऱ्यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात