मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /यवतमाळमध्ये अजबच घडलं, भर रस्त्यात गुंडाने पोलिसाला बेदम मारलं

यवतमाळमध्ये अजबच घडलं, भर रस्त्यात गुंडाने पोलिसाला बेदम मारलं

पोलिसच मार खातोय हे बघून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसच मार खातोय हे बघून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसच मार खातोय हे बघून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

भास्कर मेहेरे, यवतमाळ 27 ऑगस्ट: यवतमाळ मध्ये पोलिसांवर अवैध व्यावसायिकांकडून हल्ले होत असल्याच्या घटना घडत असल्याने खळबळ उडाली आहे. सलग तीन घटना घडल्यानंतर आणखी एका पोलिसाला भर रस्त्यात लाथा बुक्क्या हाणून वर्दीचे धिंडवडे उडविल्याचा प्रकार उजेडात आला आहे. स्थानिक बाजोरिया नगर लगतच्या विदर्भ हाऊसिंग सोसायटीत वर्दीवर असलेल्या एका मद्यपी पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद झाल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडाने भर रस्त्यात पोलिसाला बदडले आणि रस्त्यावर लोळवून धिंगाणा घातला. पोलिसच मार खातोय हे बघून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

हा खळबळजनक आणि पोलीस विभागाला शरमेने मान खाली घालायला लावणारा प्रकार एका कार चालकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. आता हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

वर्दीत असलेल्या पोलिसाला मारहाण करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी गुंडांवर वचक निर्माण करण्यासोबतच खाकीतील बेशिस्त पोलिसांना समज देतील का असा प्रश्न आता विविध सामाजिक संघटना विचारत आहेत.

First published:

Tags: Police