कोरोनात दुहेरी संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, जिल्हाधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

कोरोनात दुहेरी संकट: यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचे राजीनामे, जिल्हाधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय हीन भाषेत उत्तर देऊन अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप डॉक्टरांनी केला आहे.

  • Share this:

यवतमाळ 28 सप्टेंबर: कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर्स आघाडीवर लढत आहेत. आरोग्य सेवकांवर कामाचा प्रचंड ताण आहे. संकट कायम असताना आता यवतमाळ जिल्ह्यात नवं संकट आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत तब्बल 85 डॉक्टरांनी राजीनामे दिले असून काम बंद आंदोलनाला सुरूवातही केली आहे.

यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप करत  परिषद आरोग्य विभागाच्या मॅग्मो संघटनेच्या 85 वैदयकीय अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे वरिष्ठांकडे पाठविले असून कामबंद आंदोलन पुकारले आहे. डॉक्टरांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलंडणार असून कोरोनाच्या काळात रुग्णांना हाल सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

कोरोना काळात डॉक्टर जीवाची बाजी लावून कोरोना रुग्णासाठी काम करत आहेत. त्यामुळे डॉक्टर पॉझिटिव्ह आले तर त्यांच्यासाठी आणि परिवारातील सदस्यासाठी महाविद्यालयात बेड उपलब्ध करून द्यावे, आठवड्यातून एक दिवस सुटी देण्यात यावी, तसेच कामाचा अहवाल सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा या मागण्या घेऊन मॅग्मो संघटनेचे डॉक्टर्स जिल्ह्याधिकाऱ्यांकडे गेले होते. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय हीन भाषेत उत्तर देऊन अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप डॉक्टरांनी केला आहे.

एका क्षणात आई-वडिलांसह 3 बहिणींना गमावलं, 9 वर्षीय चिमुकला झाला पोरका

त्यामुळे हे डॉक्टर्स संतप्त झाले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या  85 डॉक्टरांनी आपल्या वरिष्ठांकडे राजीनामे पाठविले असून तात्काळ कामबंद आंदोलन सुरू केले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 28, 2020, 8:46 PM IST

ताज्या बातम्या