एका क्षणात आई-वडिलांसह 3 बहिणींना गमावलं, 9 वर्षीय चिमुकला झाला पोरका

चिमुकल्याच्या डोक्यावरील आई - वडिलांचे मायेचे छत्र हरपल्याने त्याला आता मदतीचे छत शासन देईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

चिमुकल्याच्या डोक्यावरील आई - वडिलांचे मायेचे छत्र हरपल्याने त्याला आता मदतीचे छत शासन देईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • Share this:
भिवंडी, 28 सप्टेंबर : भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड इथं जिलानी इमारत कोसळून 20 मुलांसह 38 जणांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले होते. मात्र आजीच्या आग्रहामुळे 9 वर्षीय शादीक हा चिमुकला आजीकडे थांबला अन् त्याचा जीव वाचला. मात्र इमारत दुर्घटनेत या चिमुकल्याच्या आई - वडिलांसह तीन बहिणींचा दुर्दैवी अंत झाला. या स्थितीतही 9 वर्षीय शादीक आजीला चिटकून तिचीच समजूत काढत असल्याचं हृदयद्रावक चित्र पाहावयास मिळत आहे. भिवंडी दुर्घटनेत शादीक खान याचे वडील मोहम्मद मुर्तुजा उर्फ लाला मुस्तफा खान (वय 33 वर्ष ), आई फरीदा बानो मुर्तझा खान ( वय 34 वर्षे  ) बहिणी फरहा  खान ( वय 6 वर्षे  ) फलक  खान ( वय 5 वर्षे  ) रिहा  खान ( वय 3 वर्षे  ) अशा कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. फक्त आजीकडे राहिल्याने शादीक हा बचावला आहे. आजीच्या कुशीत चिटकून बसलेला 9 वर्षांचा शादीक खान याला माहीतही नाही की आपले आई - वडील आणि तीन बहिणी आपल्याला कायमच्या सोडून गेल्या आहेत. या दु:खात आजी रडत असताना शादिक तिला चिमुकल्या हाताने कुरवाळून समजूत काढत आहे. मात्र मुलगा, सून आणि तीन नाती असे पाच जण गमावल्याने आजीच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. शादीक आणि त्याच्या कुटुंबाने रात्री आजीच्या घरी सर्व मिळून जेवण केले होते. त्यानंतर एक वाजता सर्वजण घरी निघाले असता शादीक हा बिलगून राहिल्याने त्याला त्याची आजी मज़लैन बनो हिने आज माझ्याकडे रहा उद्या जा असे म्हणून त्याला थांबवून ठेवले. शादीकचे आई-वडील आणि बहिणी घर परतले. मात्र 3 वाजता इमारत कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. या घटनेत खान कुटुंबातील मुलगा, सून आणि नाती असं सगळेच मृत्यूमुखी पडले. एका चिमुकल्याच्या डोक्यावरील आई - वडिलांचे मायेचे छत्र हरपल्याने त्याला आता मदतीचे छत शासन देईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Published by:Akshay Shitole
First published: