नागपूर, 22 मार्च : सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona virus Infection) वाढतचं चालला आहे. मुंबई, पुणे या मोठ्या शहरांत कोरोनाने थैमान घातल्यानंतर आता कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव नागपूरमध्ये (Corona patients in nagpur) वाढताना दिसतो आहे. आता नागपूर शहर कोरोना विषाणूचं नवीन हॉटस्पॉट (Corona Hotspot) बनत चालल्याचं चित्र आहे. गेल्या सहा दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख वाढतचं आहे.
गेल्या सहा दिवसांपासून नागपूरमध्ये 3 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासांत नागपूरमध्ये कोरोनाचे 3596 रुग्ण आढळले. याठिकाणी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाने नागपूरातील 40 लोकांचा बळी घेतला आहे. एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना, दुसरीकडे शहरातील विविध ठिकाणी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत. प्रशासनाकडून अनेकदा आवाहन करून देखील येथील नागरिक कोरोना नियामांचा फज्जा उडवताना दिसत आहेत.
सलग सहाव्या दिवशी नागपूरमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांने 3 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज पुन्हा नागपूरमध्ये 3596 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नागपूरमधील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या 31 हजार 67 वर पोहचली आहे. ही बाब नागपूरकरांसोबतचं राज्याचीही चिंता वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे नागपूरमध्ये कोरोना निर्बंध लादण्याची मागणी प्रशासनानकडून केली जात आहे. तसंच अनेक नागरिक निष्काळजीपणे मास्क न घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसल्याचं आढळून आलं आहे.
(वाचा -...तर लॉकडाउनच्या निर्णयाविरोधात टोकाची भूमिका घेणार नाही - फडणवीस)
सध्या देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवली जात आहे. त्यामुळे देशातील नागरिक काही प्रमाणात बिंदास्त झाल्याचं पाहायला मिळत आहेत. सरकारकडून वारंवार सूचना देऊनही नागरिक कोरोना नियमाचं पालन करताना दिसत नाहीयेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona hotspot, Corona updates, Nagpur