या चेहऱ्यामागचं नैराश्य कोणाला दिसलंच नाही, 24 वर्षाय तरुणाने केला जीवाशी खेळ

या चेहऱ्यामागचं नैराश्य कोणाला दिसलंच नाही, 24 वर्षाय तरुणाने केला जीवाशी खेळ

कुटुंबीय तसेच नातेवाईकांनी प्रकाश चव्हाणचा अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

  • Share this:

वाशिम, 29 जून : एका 24 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. रिसोड तालुक्यातील मांडवा इथल्या प्रकाश प्रकाश चव्हाण या 24 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळ दरम्यान उघडकीस आली. हा युवक 26 जूनपासून घरून न सांगता निघून गेला होता. त्यानंतर त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.

कुटुंबीय तसेच नातेवाईकांनी प्रकाश चव्हाणचा अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र तो सापडला नाही. शनिवारी सायंकाळी जंगलामध्ये जाळण्यासाठी लाकडं आणण्याकरता गेलेल्या काही मजुरांना प्रकाश चव्हाणचा मृतदेह एका झाडाला लटकलेला दिसला. त्याने तात्काळ याची माहिती पोलिसांना आणि चव्हाण कुटुंबियांना दिली.

शेतीवरच कुटुंबाचा उदर निर्वाह चालत असल्यानं तसेच शेतीतून मिळणाऱ्या अत्यल्प उत्पादनामुळे वडिलांवर कर्ज वाढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं प्रकाश हा नेहमी चिंताग्रस्त दिसायचा. कदाचित नैराश्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अगदी उमेदीच्या काळात प्रकाश चव्हाण या युवकाच्या आत्महत्येमुळे समाजमन हेलावून गेला आहे.

संजय राऊत सुशांतला 'हा' रोल करणार होते ऑफर, पण...

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून प्रसादचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर सध्या संपूर्ण प्रकरणाच तपास सुरू आहे. या घटनेमध्ये पोलीस प्रसादच्या कुटुंबाची आणि मित्रांचीही चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

घरातल्या तरुण मुलाने अशा प्रकारे आपलं आयुष्य संपवल्यामुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळा असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

आर्थिक अडचण त्यात पत्नीने सोडलं घर, मुंबईत 3 मुलांसह पतीने केली आत्महत्या

संपादन - रेणुका धायबर

First published: June 28, 2020, 9:59 AM IST

ताज्या बातम्या