जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : नागपूरमध्ये विको कंपनीला भीषण आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO

BREAKING : नागपूरमध्ये विको कंपनीला भीषण आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO

BREAKING : नागपूरमध्ये विको कंपनीला भीषण आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO

एमआयडीसी(हिंगणा)तील विको कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

तुषार कोहळे, प्रतिनिधी नागपूर, 08 मार्च : नागपूरमधील (Nagpur) एमआयडीसीमधील सुप्रसिद्ध विको कंपनीला  (Vicco company fire) भीषण आग लागली आहे. आगीची व्हिडीओ समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताचा अग्निशमन दलाच्या गाड्या कंपनीत दाखल झाल्या आहे. एमआयडीसी(हिंगणा)तील विको कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आले नाही. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

जाहिरात

नागपूरमधील जागतिक दर्जाची सुप्रसिद्ध कॉसमॅटिक विको कंपनी भीषण आग लागली. हिंगणा एमआयडीसी परिसरात असलेल्या या कंपनीला रात्री 12 वाजेच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, दुपारपर्यंत आग चांगलीच धुमसत होती. आग नेमकी कोणत्या कारणे  लागली हे अद्याप कळू शकले नाही.  पॅकेगिंग विभागात अल्कोहोल व वॅक्स हे पदार्थ असल्याने आग वेगाने भडकली. आग लागलेल्या उसाच्या फडात शेळ्यांना वाचवायला गेले, पण परत आलेच नाही! आगीवर फोमचा पण मारा करण्यात आला मात्र, अल्कोहोलमुळे त्याचा तितका प्रभाव पडला नाही व आग भडकतच राहिली. आगेमुळे तयार झालेल्या उष्णतेमुळे कंपनीची स्टोअरेज इमारत कोसळली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीपर्यंत पोहचणे अवघड झाले होते. जेसीबीच्या मदतीने मलबा बाजूला केल्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मागच्या दोन महिन्यात नागपूरच्या एमआयडीसी परिसरात मोठ्या कंपन्यांना आग लागल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहे. त्यामुळे एमआयडीसीची अग्निशमन यंत्रणा कंपन्यांचे फायर ऑडिट करत की नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात