मुंबई, 14 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉनचं प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात होईल, अशी घोषणा केली. अनिल अग्रवाल यांच्या या ट्वीटनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या रशियामध्ये आहेत. ‘वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू’, असं फडणवीस म्हणाले आहेत. ‘मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत’, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2022
महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. https://t.co/2X0oGP2ujX
माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला?
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2022
स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर !
‘माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर!’, असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. वेदांताचं ‘महा’व्हिजन, प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर अध्यक्षांनी सांगितलं महाराष्ट्रासाठीचं प्लानिंग काय म्हणाले वेदांताचे अध्यक्ष? ‘आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. गुजरात जेव्हीमध्ये महाराष्ट्र हा आमच्या पुढच्या एकीकरणाचा भाग असेल, यातून आम्ही महाराष्ट्रामध्ये हब बनवू,’ असं आश्वासन वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिलं आहे.