मुंबई, 24 डिसेंबर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यानंतर आज दुपारी 1 वाजता या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार आहे. प्रकाश आंबडेकर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत भीमा कोरेगावमधील शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एल्गार परिषदेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भीमा-कोरेगावची लढाई म्हणून इतिसाहास प्रसिद्ध असलेल्या या लढाईतल्या विजयाला 1 जानेवारी 2018 रोजी 200 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी कोरेगाव भीमा याठिकाणी मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर सरकारकडून एल्गार परिषदेचे आयोजन करणाऱ्या लेखक आणि साहित्यिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. शरद पवारांनीही घेतली आक्रमक भूमिका भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर झालेल्या एल्गार परिषदेतील लोकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘या प्रकरणात पुणे पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत अनेक साहित्यिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याकडून तपास काढून घ्या, अशी मागणी शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. जयंत पाटलांनी पुन्हा घेतली भाजपची फिरकी, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही केलं भाष्य ‘एल्गार परिषदेत नामदेव ढसाळ यांच्या ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो’ ही कविता म्हटली म्हणून काही जणांवर खटले दाखल करण्यात आले. पोलिसांनी आपल्या अधिकाराचंचा गैरवापर केला. अशा पोलिसांचं निलंबन करून निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमावी. तीव्र मते मांडली म्हणून ज्यांना तुरुंगात टाकलं त्याबाबत चौकशी करावी,’ असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







