मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING : लहान मुलांना लस आणि ज्येष्ठांना बूस्टर डोस द्यायचा, अशी आहे केंद्राची नियमावली!

BREAKING : लहान मुलांना लस आणि ज्येष्ठांना बूस्टर डोस द्यायचा, अशी आहे केंद्राची नियमावली!

ही नियमावली 3 जानेवारी 2022 पासून लागू होणार असून वेळोवेळी तिच्यात सुधारणा केली जाईल

ही नियमावली 3 जानेवारी 2022 पासून लागू होणार असून वेळोवेळी तिच्यात सुधारणा केली जाईल

ही नियमावली 3 जानेवारी 2022 पासून लागू होणार असून वेळोवेळी तिच्यात सुधारणा केली जाईल

पुणे, 27 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे () रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची लाट रोखण्यासाठी लहान मुलांना सुद्धा लसीकरणासाठी परवानगी दिली आहे.  15 ते 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण आणि कोमॉर्बिड ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोस (Corona vaccine booster dose in india) संबंधीच्या नेमक्या गाईडलाईन्स काय असणार आहेत, यासंबंधीचे सविस्तर परीपत्रकच आज केंद्र सरकारकडून आरोग्य विभागास पाठवण्यात आले आहे.

15 ते 18 वयोगटातील मुलांना येत्या 3 जानेवारी 2022 पासून लसीकरण सुरू होत आहे. या लाभार्थ्यांना केवळ लहान मुलांसाठी असलेली कोव्हॅक्सिनची लस देण्यात येणार आहे. या नवीन नियमावलीनुसार, लहान मुलांसंबंधीचे लसीकरण आणि बुस्टर डोस देण्यासाठीचे निकष काय असणार आहेत य याची माहिती देण्यात आली आहे.

लसींचा प्राधान्यक्रम काय असेल? कधी मिळणार बूस्टर डोस?

आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्सना येत्या १० जानेवारी २०२२ पासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पण त्यांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेल्यांनाच हा बूस्टर डोस घेता येणार आहे  आणि ६० वर्षांवरील नागरिक जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, अशांना १० जानेवारी २०२२ पासूनच बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पण या लोकांना सरसकट बूस्टर डोस मिळणार नाही. तर त्यांच्या डॉक्टरांनी जर सुचवलं की त्यांना बूस्टर डोसची गरज आहे तरच अशा नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. पण त्यासाठी देखील या नागरिकांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेले असणं गरजेचं आहे.

बूस्टर डोससाठी कशी असेल कोविन सिस्टिम?

- आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेले जे नागरिक बूस्टर डोससाठी पात्र आहेत त्यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाउंटवरुनच बूस्टर डोस घेता येणार आहे. कोविन सिस्टिममध्ये बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी दुसरा डोस कोणत्या तारखेला घेतला आहे, त्यावरुनच त्यांना बूस्टर डोस घेता येणार आहे.

- बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोसनंतर जेव्हा त्यांची या बूस्टर डोससाठी तारीख ड्यू असेल त्यापूर्वी कोविन सिस्टिममकडून एसएमएस पाठवण्यात येईल.

- बूस्टर डोससाठी ऑनलाइन आणि थेट लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार आहे.

- बूस्टर डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या लस प्रमाणपत्रावर त्याचा तसा स्पष्ट उल्लेख असेल.

१५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कशी असेल कोविन सुविधा?

ज्या मुलांचं वय हे १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल तसेच ज्यांचं जन्म वर्ष २००७ किंवा त्यापूर्वीचं असेल ते सर्व लस घेण्यात पात्र असून त्यांना कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल. कोविनवरील सध्याच्या अकाऊंटवरुन किंवा नव्यानं अकाउंट तयार करुन या लाभार्थ्यांना नोंदणी करता येईल. यासाठी त्यांना युनिक मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. सध्याच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ही सोय उपलब्ध असेल. या लाभार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही फॅसिलिटी रजिस्ट्रेशन मोडद्वारे नोंदणी करता येईल.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा ऑनसाईट (वॉकइन) नोंदणी करता येणार आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. कारण याच लशीला सध्या परवानगी देण्यात आली आहे. ही नियमावली 3 जानेवारी 2022 पासून लागू होणार असून वेळोवेळी तिच्यात सुधारणा केली जाईल, असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

First published: