मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसानं थैमान घातलं. यात शिवडी भागात रस्ता खचला आहे.
रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला (Mumbai) झोडपून काढलं आहे. चेंबूरमध्ये संरक्षक भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विक्रोळीत एक दुमजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची वृत्त आहे.