मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

UPSC: घरीच केला अभ्यास अन् पहिल्याच प्रयत्नात UPSC पास, बीडच्या शेतकऱ्याच्या मुलीची गगनभरारी

UPSC: घरीच केला अभ्यास अन् पहिल्याच प्रयत्नात UPSC पास, बीडच्या शेतकऱ्याच्या मुलीची गगनभरारी

Beed farmer daughter passed UPSC exam in first attempt: बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलीने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत घवघवीत यश मिळवलं आहे.

Beed farmer daughter passed UPSC exam in first attempt: बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलीने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत घवघवीत यश मिळवलं आहे.

Beed farmer daughter passed UPSC exam in first attempt: बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलीने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत घवघवीत यश मिळवलं आहे.

बीड, 15 जानेवारी : मागासलेला आणि ऊसतोड मजूरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात (Beed district) शेतकऱ्याच्या मुलींने यूपीएससी परीक्षेत (UPSC exam) मोठे यश संपादन केलं आहे. घरीच अभ्यास करत राज्यात पहिली तर देशात 36 व्या रँकवर येण्याचा बहुमान या मुलीने मिळावलाय. पाहुयात पहिल्याच प्रयत्नात या शेतकऱ्याच्या मुलींने कसं यश संपादन केलं.

बीडमध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि घरी राहूनच अभ्यास करून, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाला गसवणी घालण्याची किमया या बीडच्या कन्येने केली आहे. श्रद्धा नवनाथ शिंदे (Shraddha Navnath Shinde) असं त्या तरुणीचे नाव आहे. श्रद्धा हिने यूपीएससीच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत राज्यात पहिला तर देशात 36 वा रँक मिळवला आहे. श्रद्धाचे वडील हे बीड तालुक्यातील लोणी शहाजानपूर (Loni Shahajanpur Beed) येथील असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर आई गृहिणी असून त्या अशिक्षित आहेत.

वाचा : Career Tips: कोणत्याही कोर्टात न्यायाधीश होण्यासाठी काय पात्रता आवश्यक? वाचा

राज्यात पहिला तर देशात 36 वा रँक

श्रद्धाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडलाच झाले. नंतर तिने औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन 2018 साली अभियांत्रिकीची पदवी हाती घेतली. त्यानंतर तिने थेट दिल्ली गाठली आणि सात महिने शिकवणी केली. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये यूपीएससीची प्रिलिमनरी परीक्षाही दिली. या पहिल्याच प्रयत्नात आणि पहिल्याच परीक्षेत तिला यशही मिळाले. त्यात श्रद्धाने राज्यात पहिला तर देशात 36 वा रँक मिळविला आहे. तर तिने याचे श्रेय आई - वडीलांसह गुरुजनांना दिले आहे.

आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस

तर याविषयी वडील नवनाथ शिंदे म्हणाले, की मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. लहानपणापासून श्रद्धाची जिद्द होती शिकायची, तिच्या शिक्षणासाठी मी खूप काही केलं असून तिने यामध्ये मोठे यश मिळवले आहे. श्रद्धा हिला मी मुलाप्रमाणे सांभाळले आहे. मुलापेक्षा जास्त तिला मी समजत आहे. त्यामुळे खरंच असा भेदभाव करायची गरज नाही, लोक म्हणतात मुलगी आहे, 18- 20 वर्ष झाले की लग्न करायचं, नको शिकवायचं. मात्र मी तसं केलं नाही. त्यामुळे आज माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे अशी प्रतिक्रिया श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांनी दिली आहे.

वाचा : आजच्या स्पर्धेच्या युगात ही 10 कौशल्यं तुमच्याकडे असलीच पाहिजे!

श्रद्धाच्या आईने म्हटलं, आज मला खूप आनंद होत आहे. मी पहिलीपर्यंत देखील शिकलेली नाही, माझी मुलगी आज शिकलीय. मला खूप अभिमान वाटतोय. ती सुरुवातीपासूनच खूप अभ्यास करत होती. एखादं काम सांगितलं तर मला अभ्यास करू दे, असं म्हणायची. आज तिने आमचं नाव खूप मोठं केलं असून मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतोय.

दरम्यान बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र याच बीड जिल्ह्यातील या शेतकरी कन्येने, यूपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन करून अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये आपलं आणि आपल्या वडिलांसह जिल्ह्याचं नाव कोरलंय. त्यामुळं तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

First published:

Tags: Beed, Career, Upsc exam