मराठी बातम्या /बातम्या /करिअर /आजच्या स्पर्धेच्या युगात ही 10 कौशल्यं तुमच्याकडे असली पाहिजे, जाणून घ्या हे मुद्दे!

आजच्या स्पर्धेच्या युगात ही 10 कौशल्यं तुमच्याकडे असली पाहिजे, जाणून घ्या हे मुद्दे!

कोरोनाच्या (corona) महासाथीमुळे जगात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मोठे बदल झाले आहे.

कोरोनाच्या (corona) महासाथीमुळे जगात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मोठे बदल झाले आहे.

कोरोनाच्या (corona) महासाथीमुळे जगात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मोठे बदल झाले आहे.

  मुंबई, 13 जानेवारी : कोरोनाच्या (corona) महासाथीमुळे जगात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मोठे बदल झाले. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे इंटरनेटवरचं (internet) वाढलेलं अवलंबित्व. कारण प्रत्यक्ष वावरावर निर्बंध आल्यामुळे ऑनलाइन (online) विश्वातला वावर वाढवण्याशिवाय पर्यायच नव्हता. मुलांच्या शाळा-क्लासेसपासून (school-classes) मोठ्यांच्या मीटिंग्जपर्यंत अशा जीवनातल्या शक्य त्या सर्वच गोष्टी ऑनलाइन व्हायला लागल्या आहेत. त्यात येणाऱ्या अडचणी हा स्वतंत्र विषय आहे; मात्र ऑनलाइन विश्वात जगण्याला आता पर्याय राहिलेला नाही हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने काही कौशल्यं आत्मसात करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती कौशल्यं कोणती याची थोडक्यात माहिती घेऊ या. 'रेडीफ डॉट कॉम'ने करिअर कोच डॉ. श्रुती मयूर यांचा याविषयीचा लेख प्रसिद्ध केला आहे.

  1) निर्णयक्षमता (Decision Making)

  निर्णयक्षमता हे असं कौशल्य आहे, की जे कोणत्याही काळात आपल्याकडे असणं आवश्यकच असतं. आताच्या काळात त्यात झालेला बदल असा आहे, की निर्णय वेगाने घ्यावे लागतात. त्यासाठी SEO Tools, गुगल अॅनालिटिक्स, गुगल फॉर्म्स, Tableau यांसारख्या विश्लेषणपर टूल्सची मदत घेता येते.

  2) विचार करण्याची पद्धत (Thinking)

  आपली विचार करण्याची पद्धत थोडी बदलण्याची आवश्यकता आजच्या काळात आहे. ग्राफ्स, आकडे असे पॅटर्न्स पाहून पटकन समजून घेण्याची सवय नसेल तर ती लावून घेतली पाहिजे. त्याच्या साह्याने आपल्याला काही गुंतागुंतीच्या गोष्टी लवकर समजून घेऊन त्यावर उत्तरं शोधता येतील. याला पॅटर्न थिंकिंग Pattern Thinking असं म्हणतात.

  3) डिजिटल साक्षरता

  वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जाणारं तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि वापरलं पाहिजे. कारण आपण आज अशा समाजात राहतो की जिथे डिजिटल प्लॅटफॉर्म्स हेच संवादाचं मुख्य माध्यम आहे. तसंच, तंत्रज्ञानाच्या मर्यादा, धोके या गोष्टीही समजून घेणं आवश्यक आहे. या सगळ्याला Digital Literacy असं म्हणतात.

  4) जुळवून घेण्याची क्षमता (Adaptability)

  सध्याच्या काळात बदल फार वेगाने आपल्या अंगावर येत आहेत. त्यामुळे बदलांशी तातडीने जुळवून घेऊन निर्णय घेण्याची क्षमता अंगी बाणवण्याला पर्याय नाही. आपल्या नियंत्रणात कोणत्या गोष्टी आहेत आणि कशावर आपलं नियंत्रण नाही, या गोष्टींची स्पष्ट कल्पना आपल्याला असली, तरच बदलत्या वातावरणात आपल्याला तग धरता येईल.

  5) लवचिकता (Resilience)

  जुळवून घेण्याच्या क्षमतेचाच दुसरा भाग म्हणजे लवचिकता. हा गुण असेल, तर वाईट परिस्थितीतून लवकर बाहेर पडता येतं. नुकसान कधीही, कोणालाही होऊ शकतं, वाईट गोष्टी घडू शकतात; मात्र लवचिकता असेल, तर या सगळ्यातून लवकर बाहेर पडता येतं.

  6) क्रिएटिव्हिटी (Creativity)

  आउट ऑफ बॉक्स विचार करणं गरजेचं आहेच; पण त्याहीपुढे जाऊन न्यू बॉक्स किंवा अदर बॉक्स किंवा नो बॉक्स अशी संकल्पना अमेरिकी लेखक-दिग्दर्शक अॅलन रॉबर्ट यांनी मांडली आहे. एकाच विचाराच्या वेगवेगळ्या बाजू समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी चर्चा केली, तर कल्पनाशक्ती, सर्जनशीलता अर्थात क्रिएटिव्हिटी वाढू शकते.

  7) ताणांचं व्यवस्थापन (Stress Management)

  ताण ही आजच्या युगातली अपरिहार्य गोष्ट आहे. ताणामुळे सर्वांत जास्त थकवा येतो. त्यामुळे ताणाचं व्यवस्थापन करायला शिकलं पाहिजे. त्यासाठीही पुन्हा आपल्या नियंत्रणातल्या गोष्टी आणि नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी यांमधला फरक ओळखता येणं गरजेचं आहे.

  8) नेतृत्वगुण (Leadership)

  आपल्याबद्दल विश्वास तयार करणं हा चांगल्या नेत्यासाठी आवश्यक गुण आहे. डिजिटल टीम्सच्या बाबतीतही हे लागू असतं. क्षमता असणं, विश्वास तयार करणं, दुसऱ्यांची काळजी घेणं आणि कनेक्टेड असणं आणि आपल्यावर विश्वासाने कोणी अवलंबून राहू शकतं अशी प्रतिमा तयार करणं यासाठी आवश्यक असतं.

  9) भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence)

  पर्सनल आणि सोशल अवेअरनेस या दोन्ही गोष्टी प्रत्येकाकडे असल्या पाहिजेत. या दोन्हींमध्ये संतुलन असेल, तर भावनिक बुद्धिमत्ता चांगली राहते. ही गोष्ट योग्य मेंटॉरिंगद्वारे शिकता येते.

  10) शिकणं (Learning)

  सदा सर्वकाळ शिकण्यासाठी प्रत्येकाने तयार असायला हवं, ही आजच्या काळाची गरज आहे. आपल्या स्वतःच्या किंवा इतरांच्या अनुभवांतूनही शिकता आलं पाहिजे.

  First published:
  top videos