जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Yogi Adityanath :युपीमध्ये गुंतवणुकीसाठी योगींचा मुंबईत रोड शो, उद्योगपतींशी चर्चा करणार

Yogi Adityanath :युपीमध्ये गुंतवणुकीसाठी योगींचा मुंबईत रोड शो, उद्योगपतींशी चर्चा करणार

Yogi Adityanath  :युपीमध्ये गुंतवणुकीसाठी योगींचा मुंबईत रोड शो, उद्योगपतींशी चर्चा करणार

उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल (दि.04) बुधवारी दुपारी मुंबईत दाखल झाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 जानेवारी : उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आणण्याबाबत परदेशात यशस्वी रोड शो केल्यानंतर योगी आदित्यनाथ आता विविध राज्यांना भेटी देत आहेत. उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल (दि.04) बुधवारी दुपारी मुंबईत दाखल झाले. मुंबईतील नामांकित ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी योगी आदित्यनाथ हे गुरुवारी दिवसभर भेटी आणि बैठका घेऊन चर्चा करणार आहेत.

जाहिरात

आदित्यनाथ यांचा मुंबईत आज रोड शो होत आहे. दरम्यान योगींचे देशातील नऊ महत्वाच्या शहरांमध्ये रोड शो होणार आहेत यामध्ये ते राज्यातील गुंतवणूकीबाबत चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. काल मुंबईत योगी आदित्यनाथ दाखल होताच विविध मान्यवरांच्या भेटी घेत विविध विषयांवर चर्चा केली.

हे ही वाचा :  बांदेकरांसोबतची मैत्री कर्तव्याच्या आड येवू देऊ नका, सिद्धीविनायक मंदीर प्रकरणी मनसेचा फडणवीसांना इशारा

योगी आदित्यनाथ हे आपल्या मुंबई दौऱ्यात टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, मिहद्रा, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, बाँबे डाईंग, ब्रिटानिया, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स, हिताची, हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी, अशोका लेलँड्स, ओस्वाल इंडस्ट्रीजसह अनेक कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि ज्येष्ठ उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या उत्तर प्रदेशातील मान्यवरांशी चर्चा ते करणार आहेत. उत्तर प्रदेशात चित्रनगरी (फिल्मसिटी) उभारण्यात येत असून त्यादृष्टीने बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आदींशीही चर्चा करणार आहेत.

जाहिरात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच गुरुवारी दिवसभरात उद्योजक तसेच मान्यवरांच्या १७ विविध बैठका त्यांनी आयोजित केल्या आहेत. या बैठकांमध्ये उद्योजकांशी संवाद साधणार आहेत.

आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारणार

उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारून मुंबईमधील चित्रपट उद्योग नष्ट करण्याचा घाट योगी आदित्यनाथ यांच्याकडून घातला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातो. आदित्यनाथ यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. दरम्यान, माध्यम प्रतिनिधींशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  देवेंद्र फडणवीसांची यशस्वी मध्यस्थी, वीज कर्मचारी संघटनांसोबतच्या बैठकीनंतर संप मागे

मुंबई ही मुंबई आहे. हे शहर अर्थभूमी आहे. तर उत्तर प्रदेश राज्य हे धर्मभूमी आहे. या दोघांचा सुंदर संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात