मुंबई : कोरोनात सगळंच बंद असल्याने शिक्षणही ऑनलाईन झालं आणि घराघरात कमी वयातही मुलांच्या हातात फोन आले. स्मार्ट फोन सहज अॅक्सिसेबल झाले. मूल त्रास देतं म्हणून अगदी सहज आई वडील त्याच्या हातात कार्टून किंवा काहीतरी पाहायला म्हणून फोन देतात. एकदा त्याची सवय लागते मग मुलं ऐकत नाहीत अशी अवस्था होते. आता तर कोरोनानंतर मुलांच्या हातात अगदी कमी वयात फोन आले आहेत. याच मोबाईलमुळे मुलांचं नुकसान होत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं आहे. मुलांच्या मोबाईल वापरावर नितीन गडकरी संतापले मोबाईल कुठून आला माहिती नाही. संपूर्ण पिढी मोबाईलने उद्ध्वस्त केल्याचं सांगत मोबाईलवर गेम खेळताना कधी मुल पोर्न व्हिडीओ पाहतील सांगता येत नसल्याचं सांगत रोष व्यक्त केला आहे. नागपुरात क्रीडा महोत्सव झाला, 7000 मुलांनी सहभाग घेतला. खेळाचे मैदान आणि स्विमिंग टँक बनवले तर मुलांना खेळायला बरं होईल, नाहीतर तुमच्या मुलांचं काय आणि माझ्या मुलांचं काय, दिवसभर मोबाईलवर बोलत राहतात. आज ते मोबाईलमध्ये कार्टून पाहतात, उद्या तीच मुलं पॉर्न फिल्म पाहतील, हा मोबाईल कुठून आला माहीत नाही, याने संपूर्ण पिढी उद्ध्वस्त केली आहे.
Nagpur News: ‘मी विहिरीत उडी मारेन पण…’, काँग्रेस नेत्याच्या ऑफरवर असं का म्हणाले होते नितीन गडकरी? स्वतः सांगितला किस्सामला एक चांगली बाग हवी आहे, असे मैदान हवे आहे जिथे लाखो मुले दररोज संध्याकाळी दोन तास मैदानावर खेळायला येतात. आज मुलं मैदानावर जाऊ खेळणं विसरत चालली आहेत असंही यावेळी नितीन गडकरी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान मानतली ही खंत आणि मोबाईलबाबतचा रोष व्यक्त केला आहे.