— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2021नागरिक घरांत अडकून पडले आहेत. शहराचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचा मदतीसाठी आक्रोश सुरू आहे. खासदार विनायक राऊत यांनीही मदतीसाठी नेव्हीला पाचारण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. एनडीआरएफच्या तुकड्याही कोकणात रवाना झाल्या आहेत. PHOTOS: मुसळधार पावसाने बदलापुरात पूरस्थिती! इमारतींचा तळमजला पाण्याखाली; गाड्याही पाण्यात चिपळूणच नाही तर खेड आणि रत्नागिरीतील इतर परिसरात सुद्धा अशाच प्रकारे परिस्थिती निर्माण झाली आहे. तर रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे महाड शहर संपूर्ण जलमय झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 165.18 मिमी पावसाची नोंद झाली आहे. माथेरान येथे सर्वाधिक 331 मिमी तर कर्जत 321 मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील जगबुडी नदीला पूर आल्याने खेड मधील खाडीपट्टा विभागातील अलसुरे मोहल्ल्याला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या मोहल्ल्यात जवळपास 120 हून अधिक लोक अडकले आहेत. या गावात जाणारे सगळे मार्ग बंद झाल्याने गावात मदत करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chiplun, Maharashtra, Mumbai, Rain, Ratnagiri