मुंबई, 13 ऑक्टोंबर : महाविकास आघाडीला पायउतार करून मागच्या तीन महिन्यापूर्वी भाजप आणि शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत चांगलाच दणका दिला. जवळपास महाविकास आघाडीने केलेल्या कामांची मंजूरीला स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे आणि फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान शिंदे गटाकडून पुन्हा काही विकास कामांच्या मंजुरीला स्थगिती देण्यात आली आहे. यावर ठाकरे गटाकडून शिंदे सरकराच्या या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला आहे. ग्रामविकास खात्याच्या निर्णयाविरोधात हा लढा असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गट आता या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा : ‘तुम्ही भेदभाव करताय, आमची रणनीती तुम्हीच उघड केली’; ठाकरे गटाचे निवडणूक आयोगावर 12 ‘बाण’
पहिल्यांचा राष्ट्रवादीच्या कामांना स्थगिती दिली नंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या कामांना स्थगिती दिल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदार संघात विकास थांबल्याची टीका करण्यात आली होती. दरम्यान ग्रामविकास खात्याच्या निर्णयाविरोधात घेतलेल्या भुमीकेवर ठाकरे गटाचे आमदार कोर्टात जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मागच्या तीन महिन्यापासून शासन निर्णयावरून ठाकरे, शिंदे गट एकमेकांवर आगपाखड करताना दिसत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा शासनाच्या निर्णयावरून ठाकरे गट आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यागटाकडून टीका होताना पहायला मिळणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून मंजूर केलेल्या कामांपैकी ज्या कामांचे कार्यारंभ आदेश दिलेले नाहीत किंवा कार्यारंभ आदेश देऊनही कामे सुरु झालेली नाहीत, अशा सर्व कामांना स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे मागच्या दिड वर्षांपूर्वी मिळालेल्या कामांना आता शिंदे गटाकडून स्थगिती देण्यात आल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : ‘ऋतुजा लटकेंविरोधात अनिल परबांनीच रचला डाव’, राजीनामा प्रकरणात मनसेचा गंभीर आरोप
यावर ठाकरे गटाकडून शिंदे सरकराच्या या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला आहे. ग्रामविकास खात्याच्या निर्णयाविरोधात हा लढा असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गट आता या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे बोलले जात आहे.

)







