मुंबई, 26 ऑक्टोबर : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्हा गोठवण्यात आले. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाला वेगवेगळी चिन्हे देण्यात आले. दरम्यान खरी शिवसेना कोणाची यावर निवडणूक आयोगात अद्याप लढाई सुरू आहे. यावरून ठाकरे गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण मिळवण्यासाठी जोरदार बांधणी सुरू आहे. यासाठी ठाकरे गटाकडून मागच्या दोन दिवसांपूर्वी तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्रं जमा केली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञपत्र पुन्हा निवडणूक आयोगाने बाद ठरवली आहेत. दरम्यान ही माहिती चुकीची असल्याची माहिती ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकीचा असल्याने ती प्रतिज्ञपत्र चुकीची असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने जो काही मजकूर ठरवून दिला होता त्या प्रमाणे न दिल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे. हे नियम पाळण्यात न आल्यानेच ही प्रतिज्ञापत्रं नाकारण्यात आली आहेत. दरम्यान उर्वरित साडे आठ लाख प्रतिज्ञापत्रं स्वीकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा : ‘भाजपला आता जाणवलंय की आपण एकमेकांना…’; महायुतीच्या चर्चांवरुन जयंत पाटलांचा टोला
यावर ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग म्हणाले की, निवडणूक आयोगाने आपल्याला यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नसल्याची माहिती ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी माध्यमांना माहिती दिली. ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी आपण आयोगाने दिलेल्या फॉरमॅटनुसारच प्रतिज्ञापत्रं दिली असून, हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं. “निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचं कोणतंही प्रतिज्ञापत्र लागत नाही. एखाद्या पक्षाला मान्यता देणं किंवा चिन्ह देणं याचे नियम ठरलेले आहेत.
हे ही वाचा : आधी अवैध फोन टॅपिंग प्रकरणात दिलासा, आता रश्मी शुक्ला यांना मिळणार हे मोठं ‘गिफ्ट’?
गेल्या 20 वर्षांत वेगवेगळ्या आयुक्तांनी त्यासंदर्भात दिलेले निर्णय प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत, कुणाचे रद्द झालेत, कुणाचे टिकले हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी चाललं आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं.