मुंबई, 21 जून : नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. पण यावर गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सुरक्षा रक्षकांना पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश अचानक गृह खात्याकडून उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा यंत्रणेत कपात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. साधारणपणे 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत गुंतले होते. मात्र, आता या सर्वांनाच कमी करून पुन्हा पोलीस ठाण्ंयामध्ये रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. तसंच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी केली कमी केली असून पायलटही कमी करण्यात आला आहे. मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षादेखील काढून टाकण्यात आली. मातोश्रीच्या सुरक्षेततही कपात मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सिक्युरिटी तर आदित्य ठाकरे यांना वाय प्लस सिक्युरीटी आहे. शासन निर्णय 27 ऑक्टोबर 2022 नुसार मान्यवरांना वर्गीकृत संरक्षण पुरविण्यात येते. त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच रश्मी ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झेड, तेजस ठाकरे यांना वाय प्लस एस्कॉर्ट ही वर्गीकृत सुरक्षा पुरविण्यात येत आहे. वाचा - मुलींच्या हत्या व हिसांचाराविरोधात शिंदे सरकारचा मोठा निर्णय; 3 जुलैपासून अंमलबजावणी सदरचे वर्गीकृत संरक्षण हे केंद्रीय यल्लो बुक नियमानुसार विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य मार्फत पूर्णपणे देण्यात येत आहे. वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.