मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आम्ही कधी कोणाची घर फोडली नाहीत' उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर

'आम्ही कधी कोणाची घर फोडली नाहीत' उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर

File Photo: Twitter

File Photo: Twitter

शिवेंद्रराजे यांनी केलेल्या टीकेला खासदार उदयनराजे भोसले यांनी चोख प्रत्त्युत्तर दिलं आहे.

सातारा, 19 डिसेंबर : साताऱ्यात (Satara) आरोप प्रत्यारोपांचा सामना चांगलाच रंगला असुन शिवेंद्रराजेंच्या टीकेला उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सडेतोड उत्तर देत जबरदस्त टीका केली आहे. शिवेंद्रराजेंनी काही दिवसांपूर्वी उदयनराजेंवर टीका केली होती. यामध्ये उदयनराजेंची गँग म्हणजे नारळफोड्या गँग असा उल्लेख केला होता. यामुळे नाराज झालेल्या उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना (Shivendraraje) फटकारलं आहे.

आम्ही नारळ वाढवून लोकांची चांगली कामं करतो मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायचं काम केल्याची जहरी टीका करत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना जबरदस्त उत्तर दिलं आहे. जिल्ह्यातील लोकांनी विश्वास ठेवत तुमच्या बँकांमध्ये पैसे ठेवले मात्र त्यांना फसवत तुम्ही त्यांचीच घरं फोडायची कामं केली. त्यामुळे लोकांची घर फोडण्यापेक्षा आमची नारळ फोडुन लोकांची कामं करणारी गँग चांगली असं उदयनराजें एका कार्यक्रमात म्हणालेत.

वाचा : बंगळुरूतील घटनेचे मुंबईत पडसाद, शिवाजी पार्कात शिवसेनेचे आंदोलन, शिवसैनिक आणि पोलिसांत झटापट

तसेच वय वाढल्यामुळे त्यांची बुद्धी सुद्धा लहान मुलाच्या बुद्धी पेक्षा कमी झाली आहे, त्यामुळेच त्यांनी आमच्यावर असा आरोप केला आहे. वैयक्तिक पातळीवर जावून टीका करणं हे माझ्या लेवलचं समजत नाही मात्र अत्यंत संकोचित वृत्तीची ही लोकं आहेत त्यांनी आरोप करताना विचार करायला पाहीजे. तसंच लोकांची आमच्याकडूनच कामांची अपेक्षा आहे त्यामुळेच आम्ही कामांचे नारळ फोडतो असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

'कुणीच कुणाची जिरवायला जात नसतं'

उदयनराजे भोसेले आणि शिवेंद्रराजे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू असते. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटप प्रकरणी बँकेला ईडीने नोटीस बजावली होती. या प्रकरणावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कलगीतुरा रंगला होता. 'कुणीही कुणाची जिरवायला कुठे जात नाही. त्यांची कोण जिरवणार त्यांना सल्लागारांनी सांगितलं असावं' असा टोला शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना लगावला होता.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या नोटीस संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे माहिती मागत विचारणा केली. मात्र, बँकेच्या संचालकांनी ही माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे उदयनराजे चांगलेच संतापले. उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेवरून "माझी जिरवा पण सभासदांची जिरवू नका" अशी हात जोडून संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी टीका केली होती.

First published:

Tags: Satara, Udayan raje bhosle