परवा मध्यरात्री एक वाजून तेरा मिनिटाला 2.1 रीश्टर स्केलचा धक्का बसला होता. तर सोमवारी रात्री 9 वाजून 57 मिनिटाला 1.9 रीश्टर स्केलचा धक्का जाणवला आहे. यात हासोरी, बडुर, पिरपटेलवाडी आणि अंबुलगा ह्या मुख्य गावासह या परिसरातील अनेक गावांना धक्का जाणवला आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी दिली आहे.
त्यासोबतच या भागात गेल्या काही दिवसांपासून जमिनीतून गूढ आवाज देखील येत होते. हे नेमकं काय आहे? हे शोधण्यासाठी दिल्ली आणि नागपूर येथील संशोधन करणारी टीमही येथे दाखल झाली होती. मात्र, भूकंपाचे सौम्य धक्के बसत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर संशोधन करणारी टीम गेली. त्यानंतर आता पुन्हा २४ तासात इथे दोनवेळा भूकंपाचे धक्के जाणवले.
लातूर जिल्ह्यातील भूकंपमापन केंद्रात या भूकंपाची हालचाल नोंदवण्यात आली आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात आली आहे. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी हे गाव गणेश आगमनाच्या पूर्वीपासूनच त्रस्त आहे. कारण या गावात सतत जमिनीतून आवाज येत होते. आता 24 तासात आलेल्या दोन भूकंपांमुळे नागरिक पुन्हा भयभीत झाले आहेत.
Weather Rain Update : अखेर परतीच्या पावसाची तारीख ठरली, पण मुंबई, पुणेकर पावसात अडकणार
किल्लारीचा भूकंप -
1993 ला गणेश विसर्जनाच्या दिवशी किल्लारी परिसरात भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. यात जिल्ह्यातील किल्लारी येथे 6.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला आणि काही सेकंदातच होत्याचे नव्हतं झालं. या भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर, सोळा हजारापेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या भूकंपाच्या जखमा आजही भळभळत आहेत. त्यामुळे आता पुन्हा पुन्हा जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिक घाबरले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earthquake, Latur