मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या भक्तावर काळाचा घाला, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, गाव हळहळलं

देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या भक्तावर काळाचा घाला, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, गाव हळहळलं

 दरवर्षीप्रमाणे गावात नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर वरून ज्योत आणण्याची प्रथा आहे.

दरवर्षीप्रमाणे गावात नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर वरून ज्योत आणण्याची प्रथा आहे.

दरवर्षीप्रमाणे गावात नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर वरून ज्योत आणण्याची प्रथा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 25 सप्टेंबर : नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. पण त्याआधीच बीडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तुळजापूर येथून देवीची ज्योत घेवून गावी निघालेल्या दुचाकीवरील दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन तरुणांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीड आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण इथं ही घटना घडली. महेश भास्करराव भोसले, अमोल सुरेशराव खिलारे अशी मृतांची नावे आहेत. दरवर्षीप्रमाणे गावात नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर वरून ज्योत आणण्याची प्रथा आहे.

यासाठी गावातील 50 तरुण भाविक तुळजापूर इथं शनिवारी सकाळी निघाले होते. यातील एका दुचाकीला रात्री येरमाळा येथे रात्री 9 वाजेच्या सुमारास येरमाळाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भोसले आणि खिलारे दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भोसले हा आरोग्यसेवक तर अमोल खिलारे उपसरपंच होते. दोन तरुणांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात 5 ठार

दरम्यान, नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ही घटना काल (दि.24) रात्री 8 ते 9 च्या सुमारास घडल्याची माहिती मिळत आहे. नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर सोनारीफाटा करंजीजवळ ट्रक आणि आयशर या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली.

( धक्कादायक! 120 मुला-मुलींचा एकाच ट्रकमधून प्रवास, गोंदियात खळबळ)

या अपघाताची भीषणता एवढी होती यामध्ये पाचजण जागीच ठार झाले तर पाचजण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमींना तातडीने उपचारासाठी हिमायतनगर इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published: