ठाणे, 9 ऑक्टोबर : ठाण्याच्या डोंबिवली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवली भोपरगावातील खदानीमध्ये दोन तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या खदानीमध्ये सहा तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यातील चार तरुण हे सुखरूप आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण - तर दोन तरुण या खदानीमध्ये बुडाले आहेत. यांचा शोध काम स्थानिक नागरिकांसह फायर ब्रिगेडचे अधिकारी कर्मचारी करत आहेत. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भोपर गावात खदानीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. ही मुले त्यांच्या इतर साथीदारांसह खदानीतील पाण्यात पोहायला गेली होती. हेही वाचा - 23 महिन्यांपासून बेपत्ता होती तरुणी; प्रियकराच्या घरात उत्खनन करताच बाहेर आलं धक्कादायक सत्य त्याचवेळी हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला. आयुष गुप्ता आणि आयुष केदार अशी या मुलांची नावे आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







